Home Breaking News सातारा जिल्ह्यातील पोलिसांसाठी कोविंड हॉस्पिटल उभारले.

सातारा जिल्ह्यातील पोलिसांसाठी कोविंड हॉस्पिटल उभारले.

77 views
0

विदर्भ वतन न्युज पोर्टल  सातारा जिल्हा प्रतिनिधी: विशाल गुरव
सातारा- सातारा जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. कोरोना चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकार कडून अनेक प्रयत्न केले जात आहेत. कोरोना विषाणू प्रादुर्भाव आता अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी डॉक्टर, नर्स, पोलीस कर्मचारी,सरकारी अधिकारी कर्मचारी यांनाही होत आहे. याच पार्श्वभूमीवर सातारा जिल्ह्यातील पोलिसांसाठी कोविंड हॉस्पिटल उभारण्यात आले आहे.
हॉस्पिटलमध्ये वेंटिलेटर हाय फ्लो ऑक्सिजन, ऑक्सिजन बेड, साधारण बेड, एक्स-रे मशीन, ईसीजी मशीन, कार्डियाक ॲम्बुलन्स 24 तास उपलब्ध या सुविधा असणार आहेत. 35 बेडची क्षमता असून उपलब्ध बेडची संख्या पैकी 50% बेड पोलीस अधिकारी/कर्मचारी यांच्याकरिता राखीव व 50 टक्के नागरिकांकरिता उपलब्ध असणार आहेत. दर पंधरा दिवसांनी बेड उपलब्धतेबाबत आढावा घेण्यात येणार असून आढावा अंती पुढील निर्णय घेण्यात येणार आहेत.
सातारा मेडिकल असोसिएशन मधील एकूण अकरा डॉक्टरांचा समूह याचे व्यवस्थापन पाहणार असून काही पूर्णवेळ तर काही व्हिसीटिंग फॅकल्टी असणार आहेत. तीन शिफ्टमध्ये काम चालणार आहे.
पोलीस कोविंड हॉस्पिटलचे उद्घाटन समारंभ विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर, महाराष्ट्र राज्याचे सहकार व पणन मंत्री सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील, आमदार जयकुमार गोरे, विशेष पोलीस महानिरीक्षक कोल्हापूर परिक्षेत्र डॉ. मनोजकुमार लोहिया, जिल्हाधिकारी शिखर सिंह, पोलीस अधीक्षक सातारा तेजस्वी सातपुते, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय भागवत, उपवनसंरक्षक भगतसिंह हाडा, अतिरिक्त पोलीस अधीक्षक धीरज पाटील जिल्हा शल्याचिकीत्सक सुभाष चव्हाण तसेच सर्व पोलीस अधिकारी व कर्मचारी यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.