पोलिसांच्या कोविंड हॉस्पिटल साठी सेवागिरी ट्रस्ट द्वारे ईसीजी सेट भेट.

548

विदर्भ वतन न्युज पोर्टल  सातारा जिल्हा प्रतिनिधी: विशाल गुरव

पुसेगाव : सातारा पोलिसांसाठी उभारण्यात आलेल्या कोविंड हॉस्पिटलसाठी येथील श्री सेवागिरी महाराज देवस्थान ट्रस्ट तर्फे ईसीजी मॉनिटर सेट भेट देण्यात आला. पुसेगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके यांच्याकडे मठाधिपती सुंदरगिरी महाराज व ट्रस्ट चे अध्यक्ष मोहनराव जाधव यांच्या हस्ते हा सेट सुपूर्त करण्यात आला.
कोरोना च्या लढाईत पोलिसांनी सातत्याने कोरणा योद्ध्याची भूमिका पार पाडली आहे. आपल्या कुटुंबापासून दुर राहून समाजाच्या रक्षणासाठी कार्य करणार्‍या पोलिसांची कोरूना पासून रक्षण व्हावे यासाठी उभारण्यात येत असलेल्या कोविंड हॉस्पिटलच्या उभारणीत शासन व प्रशासन सदैव सहकार्य यात अग्रेसर असणाऱ्या सेवागिरी देवस्थान ट्रस्ट द्वारे श्री. सेवागिरी मंदिरात ईसीजी मॉनिटर सेट घोडके यांच्याकडे सुपूर्त करण्यात आला. यावेळी ट्रस्टचे विश्वस्त डॉ. सुरेश जाधव, योगेश देशमुख,प्रताप जाधव,रणधीर जाधव,सुरेश शेठ जाधव तसेच लक्ष्‍मण जाधव बाळासाहेब कुलकर्णी,डॉ.अंबादास कदम, विशाल माने उपस्थित होते.