विदर्भ वतन न्युज पोर्टल

नागपूर : विदर्भासह महाराष्ट्रात सर्वदूर परिचित असलेले ज्येष्ठ पत्रकार तथा निवृत्त संपादक दि.भा. उपाख्य मामासाहेब घुमरे यांच्या निधनाने वैदर्भीय वृत्तपत्र सृष्टीतील एक आधारस्तंभ निखळला आहे. नागपूर श्रमिक पत्रकार संघाचे एकेकाळी सक्रिय सदस्य राहिलेले घुमरे यांच्या निधनाने एक ज्येष्ठ मार्गदर्शक श्रमिक पत्रकार संघाने गमावला आहे. अशी शोकसंवेदना नागपूर श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष शिरीष बोरकर, सरचिटणीस ब्रह्मशंकर त्रिपाठी, महाराष्ट्र श्रमिक संघाचे अध्यक्ष प्रदीप मैत्र, टिळक पत्रकार भवन ट्रस्ट चे उपाध्यक्ष तथा नागपूर श्रमिक पत्रकार संघाचे माजी पदाधिकारी विश्वास इंदूरकर, ट्रस्टचे विश्वस्त विनोद देशमुख यांनी संयुक्तपणे व्यक्त केली आहे. संघटनेच्या वतीने 1984 मध्ये सुट्ट्यांच्या संदर्भात झालेल्या आंदोलनात घुमरे यांचा सक्रिय सहभाग राहिला होता. तसेच 1975 / 76 च्या आणीबाणीच्या खडतर कालखंडात त्यांनी निर्भयपणे तरुण भारत वृत्तपत्राच्या संपादक पदाची धुरा यशस्वीरीत्या हाताळली. त्यांची ही कामगिरी सदैव स्मरणात राहील. असे शोक संवेदनेत म्हटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

You missed