Home नागपूर सावनेर मध्ये दिवंगत पत्रकांरांना सावनेर मराठी पत्रकार संघातर्फे श्रध्दांजली

सावनेर मध्ये दिवंगत पत्रकांरांना सावनेर मराठी पत्रकार संघातर्फे श्रध्दांजली

0
सावनेर मध्ये दिवंगत पत्रकांरांना सावनेर मराठी पत्रकार संघातर्फे श्रध्दांजली
विदर्भ वतन न्युज पोर्टल नागपूर सावनेर प्रतिनिधी-सुरेश इंगळे

नागपूर जिल्हयातील नरखेड तालूका मराठी पत्रकार संघाचे अघ्यक्ष माणिक वैद्य माथेरान येथील पत्रकार मराठी पत्रकार परिषदचे माजी सरचिटणिस संतोष पवार, वाडी येथील पत्रकार सुनील शेटटी आणि राज्यात गेल्या महिण्यात मृत्यूमुखी पडलेल्या 19 पत्रकारांना दिनांक 10 सप्टेंबर रोजी सावनेर तालूका मराठी पत्रकार संघातर्फे श्रध्दांजली अर्पण करण्यात आली.
गेल्या महिण्यात राज्यात 20 पत्रकांरांचे निधन झाले आहे. 4 दिवसापूर्वी नरखेडचे माणिक वैद्य आणि गुरूवारी सुनील शेटटी तसेच शुक्रवारी पहाटे नितीन पाचघरे, सागर जाधव व मराठी पत्रकार परिषदचे माजी सरचिटणीस संतोष पवार यांचे अकाली निधन झाले. राज्यातील पत्रकारांसाठी हा मोठा धक्का आहे. या परिषदेतर्फे पत्रकारांना श्रध्दांजली वाहण्यासाठी शुक्रवारी राज्यभर श्रघ्दांजली सभेचे आयोजन करण्यात आले होते.
सावनेर येथील विश्राम गृह सावनेर येथे तालुका मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष तेजसिंग सावजी यांच्या अध्यक्षतेखाली श्रध्दांजली सभा घेवून दिवंगत पत्रकांरांना श्रध्दांजली वाहण्यात आली. यावेळी प्रमुख उपस्थितीत सर्वश्री मनोहर घोळसे, लक्ष्मीकांत दिवटे, निलेश पटे, योगेश पाटील, दिपक कटारे सह अनेक पत्रकार उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here