Home Breaking News कराड पालिकेच्या घनकचरा प्रकल्पास पंढरपूर पालिकेच्या शिष्टमंडळाची भेट

कराड पालिकेच्या घनकचरा प्रकल्पास पंढरपूर पालिकेच्या शिष्टमंडळाची भेट

0
कराड पालिकेच्या घनकचरा प्रकल्पास पंढरपूर पालिकेच्या शिष्टमंडळाची भेट

विदर्भ वतन न्युज पोर्टल सातारा जिल्हा प्रतिनिधी
पत्रकार :अतुल खरात

कराड : येथील पालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पास पंढरपूर नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी भेट घेऊन पाहणी केली. कराड नगरपालिकेने स्वच्छ सर्वेक्षणात देशात सलग दुसऱ्यांदा प्रथम क्रमांक पटकावला आहे. त्यामध्ये आदर्श ठरलेल्या पालिकेच्या घनकचरा प्रकल्पास पंढरपूर नगरपालिके च्या शिष्टमंडळाने भेट घेऊन पाहणी केली. याप्रसंगी पंढरपूर नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी कराड नगरपालिकेच्या घनकचरा प्रकल्पाची प्रशंसा केली. या शिष्टमंडळात पंढरपूर नगरपालिकेचे स्वच्छता निरीक्षक नागनाथ तोडकर ,शरद वाघमारे, कोटगिरी, अभियंता धुमाळ आदींचा समावेश होता.
याप्रसंगी कराड पालिकेचे नोडल ऑफिसर उप अभियंता आर.डी. भालदार आरोग्य निरीक्षक मिलिंद शिंदे ,किरण कांबळे यांनी शिष्टमंडळास कराड नगरपालिकेच्या घनकचरा प्रकल्पाची माहिती दिली. यावेळी शिष्टमंडळातील अधिकाऱ्यांनी जमा होणाऱ्या कचऱ्यातील विविध घटकाचे होणारे वर्गीकरण, त्यावर होणारी प्रक्रिया प्रकल्पाबाबत माहिती घेऊन पाहणी केली.
कराड नगरपालिकेने स्वच्छ सर्वेक्षणात देशात सलग दुसऱ्यांदा प्रथम क्रमांक पटकावला आहे. त्यामध्ये पालिकेचा घनकचरा प्रकल्प आदर्श ठरला असून राज्यातील आणि पालिका कराडच्या घनकचरा प्रकल्पास भेट देत आहेत. त्यानुसारच बुधवारी पंढरपूर नगर पालिकेच्या अधिकाऱ्यांनी येशील नगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापनात भेट देऊन पाहणी केली.याप्रसंगी कराड नगरपालिकेच्या घनकचरा प्रकल्पाची पंढरपूर नगर परिषदेच्या अधिकाऱ्यांनी प्रशंसा केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here