Home Breaking News शिक्षकांच्या नियमबाहय बदल्यांची चौकशी करा . शिक्षणमंत्री गायकवाड यांचे आदेश

शिक्षकांच्या नियमबाहय बदल्यांची चौकशी करा . शिक्षणमंत्री गायकवाड यांचे आदेश

0
शिक्षकांच्या नियमबाहय बदल्यांची चौकशी करा . शिक्षणमंत्री गायकवाड यांचे आदेश

विदर्भ वतन न्युज पोर्टल 

सातारा जिल्हा प्रतिनिधी – विशाल गुरव

जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षक विभागाने शिक्षकांच्या केलेल्या बदल्यात अनियमीतता आणि भ्रष्टाचार झाल्याची तक्रार आमदार जयकुमार गोरे यांनी लेखी शिक्षणमंत्र्याकडे केली होतीण् या तक्रारीची तात्काळ दखल घेत शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिल्याने जिल्ह्याच्या प्राथमिक शिक्षण विभागात खळबळ उडाली.
जिल्हा परिषद शिक्षकांच्या जिल्ह्यांतर्गत बदल्या संगणकीय प्रणालीद्वारे करण्याबाबत फेब्रुवारी 2017 मध्ये शासनाने धोरणात्मक निर्णय घेतला होता. सर्व शिक्षकांच्या बदल्या त्यांच्या सोयीनुसार मानवी हस्तक्षेपाशिवाय आणि पारदर्शीपणे करण्याच्या सक्त सूचना देण्यात आल्या होत्या. या शासन निर्णयाद्वारे संवर्ग 1, संवर्ग 2, संवर्ग 3, आणि संवर्ग 4, असे भाग करुन प्रत्येक संवर्गमध्ये कोणते शिक्षक बदलीपात्र ठरतात, याबाबतीत मार्गदर्शक तत्वे निश्चित करण्यात आली होती. जे शिक्षक बदली पात्र ठरतील. त्यांच्याच या बदली प्रक्रियेमध्ये समावेश करण्यात आदेश देण्यात आले होते. शासनाने यावर्षी प्रशासकीय बदल्या रद्द करून फक्त विनंती बदल्या कराव्यात असा आदेश 5 जुलैच्या पत्राद्वारे देण्यात आला आहे. जिल्हा परिषदेने यावर्षी शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्या 10 ऑगस्ट रोजी केल्या आहेत. या बदल्या करताना जिल्हा परिषदेने फेब्रुवारी 2017 चा शासन निर्णय आणि त्यानंतर याबाबत आलेले परिपत्रके. निर्णयाचा भंग केला आहे. न्यायालयाचा आदेश आहे असे सांगून 12 शिक्षकांच्या बदल्या करण्यात आले आहेत. या चुकीच्या आणि नियमबाह्य बदल्या कशाच्या आधारे केल्या. याची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी करावी. या आशयाचे पत्र आमदार गोरे यांनी मंत्री गायकवाड यांना दिले होते. मंत्री गायकवाड यांनी या पत्राचे दखल घेऊन जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाने राबवलेल्या बदली प्रक्रियेची चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिल्याने शिक्षण विभागात खळबळ उडाली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here