विदर्भातील तरुणांना आत्मनिर्भर करून त्यांच्या पंखांना बळ देण्याचे कार्य करीत आहे सेवासदन शिक्षण संस्था

415
विदर्भ वतन न्युज पोर्टल नागपूर
सेवासदन शिक्षण संस्थेच्या वतीने मागील ९३ वर्षापासून विदर्भातील तरुणांना आत्मनिर्भर करून त्यांच्या पंखांना बळ देण्याचे कार्य वर्षानंवर्षा करत आलेल्या नागपुरातील सेवासदन शिक्षण संस्थेतर्फे  शैक्षणिक सत्र, व संस्थेच्या अभ्यास केंद्राद्वारे यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ संलग्नित बीबीए एव्हिएशन , हॉस्पिटॅलिटी , ट्रॅव्हल अँड टुरिझम मॅनेजमेंट हा नवीन पदवी अभ्यासक्रम या सत्रात सुरू करण्यात येत आहे. बीबीए एव्हिएशन , हॉस्पिटॅलिटी , ट्रॅव्हल अँड टुरिझम मॅनेजमेंट या अभ्यास क्रम प्रवेशाचा उदघाटन समारंभ संस्थेच्या फेसबुक पेज वर आभासी स्वरूपात दिनांक १२ सप्टेंबर २०२० रोज शनिवार ला दुपारी २ वाजता आयोजित केला आहे. या कार्यक्रमास अध्यक्ष म्हणून सेवासदन शिक्षण संस्थेच्या अध्यक्ष सौ. कांचनताई गडकरी उपस्थित राहणार असून उदघाटक म्हणून यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक च्या नागपूर विभागीय केंद्राचे विभागीय संचालक श्री. डॉ.नारायण मेहरे यांच्या हस्ते उदघाटन होणार आहे. या उदघाटन समारंभाच्या प्रमुख उपस्थितीत एअर इंडिया पश्चिम क्षेत्राचे महा व्यवस्थापक (वाणिज्य) श्री. बी.पी. कुलकर्णी, एम.ए.बी: एव्हिएशन प्रा.ली. चे प्रबंध संचालक श्री. मंदार भारदे व सेंटर पॉईंट नागपूर चे श्री. अर्जुन अरोरा व केसरी टूर्स चे महाव्यवस्थापक शैलेश पाटील केसरी है मान्यवर प्रत्यक्ष तथा व्हिजुअल बाईटस च्या माध्यमातून उपस्थितांना मार्गदर्शन करणार आहेत. शहरातील व विदर्भातील सर्व युवकांना व युवतींना विनंती आहे कि अभ्यासक्रमा विषयी माहिती घेण्यासाठी संस्थेच्या फेसबुक पेज वर करण्यात येणाऱ्या थेट प्रेक्षपणाचा लाभ जास्तीत जास्त संख्येत घ्यावा असे आवाहन सेवासदन संस्थेच्या वतीने अध्यक्ष सौ. कांचनताई गडकरी व सचिव श्रीमती इंदूबाला मुकेवर यांनी केले आहे. असे एका प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे. अधिक माहितीसाठी खालील क्रमांकावर संपर्क साधावा 0712-2520919