Home Breaking News नागरीकांनी न घाबरता संपूर्ण वैद्यकीय यंत्रणेवर विश्वास ठेवावा – श्री नितीनजी गडकरी

नागरीकांनी न घाबरता संपूर्ण वैद्यकीय यंत्रणेवर विश्वास ठेवावा – श्री नितीनजी गडकरी

173 views
0

विदर्भ वतन न्युज पोर्टल

नागपूर: नागपूर शहरात कोविडचा वाढता प्रभाव लक्षात घेता कोविड पाॅझीटीव्ह पेशंटसाठी रूग्णालयामध्ये बेड चा प्रचंड प्रमाणात तुटवडा जाणवत आहे त्यामुळे रूग्णांची व नातेवाईकांची ससेहोलपट सुरू आहे. याची गंभीर दखल घेवून नागपूर शहराचे खासदार व केंद्रीय मंत्री श्री नितीनजी गडकरी यांनी महानगरपालिकेचे आयुक्त श्री राधाकृष्णन यांचेशी चर्चा करून निर्देश दिले आहे.
कोविड रूग्णांसोबत इतर आजारी रूग्णांसोबत इतर आजारी रूग्णांना देखील सद्यस्थितीत योग्य तो उपचार मिळत नसल्याचे लक्षात आहे आहे.. त्यामुळे शहरात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे या संदर्भात खाजगी तसेच शासकीय रूग्णालयामधील डाॅक्टरांना विश्वासात घेवून शहरातील जनतेला दिलासा मिळेल व योग्य वैद्यकीय उपचार प्रत्येक रूग्णाला मिळेल याची खात्री आपण स्वतः करावी, अशाप्रकारचे निर्देश मनपा आयुक्तांना श्री नितीनजी गडकरी यांनी दिले आहे त्यावेळी मनपा आयुक्तांनी स्वतः त्वरीत निर्णय घेवून ज्या रूग्णांना रूग्णालयामध्ये जागा उलब्ध होत नाही अशा रूग्णांनी मनपा व्दारा जाहिर करण्यात आलेल्या हेल्पलाईन क्रमांक 07122567021 या क्रमांकावर फोन केल्यास त्वरीत वैद्यकीय मदत उपलब्ध करून देण्याचे आश्वासन आयुक्तांनी दिले आहे.
जनतेला वैद्यकीय सेवेबाबत तातडीने मदत हवी असल्यास श्री नितीनजी गडकरी यांच्या कार्यालयातील श्री जयंत दिक्षित (9921024700) यांचेशी संपर्क साधावा.
नागरीकांनी न घाबरता संपूर्ण वैद्यकीय यंत्रणेवर विश्वास ठेवावा व वैद्यकीय यंत्रणेने देखील जनतेला सहकार्य करावे असे आवाहन श्री नितीनजी गडकरी यांनी केले आहे.