नागपूरच्या अक्षय चौधरीचे सिनेसृष्टीत व रंगभूमी क्षेत्रात यशस्वी पदार्पण

550
विदर्भ वतन न्युज पोर्टल
नागपुरातील अक्षय चौधरी त्याने प्रथमच मुंबई येथे सिनेसृष्टीत आपली कला देण्याचा प्रयत्न करीत आज मुंबई ही सिनेसृष्टीची मायानगरी ओळखल्या जाणाऱ्या क्षेत्रात प्रवेश केला. परंतु महाराष्ट्राची उपराजधानी नागपूरचा अक्षय चौधरी यांनी मराठी रंग भूमीवर आपले प्रभुत्व गाजविले आहे. नागपुरातील सर्वसामान्य कुटुंबातील घडलेला अक्षय चौधरी यांचा नृत्य कलेने मराठी सिनेसृष्टीत 5 सप्टेंबर 2020 रोजी, अतिशय सुंदर व मनाला मोहून टाकणारे गाणं प्रस्तुत केलेलं आहे. दैनंदिन जीवन जगत असताना आपले नृत्य दिग्दर्शक बनवण्याचे स्वप्न पूर्ण केले. व आपल्या भविष्यात हे स्वप्न यशस्वीरित्या पूर्ण करीत आहे. प्रकाशित झालेलं गाणं  “मनाचा सुटलाय ताबा गो” या गाण्यांचा निर्माता व नृत्य दिग्दर्शक नागपूरचा अक्षय चौधरी यांनी अलिबाग, जिल्हा रायगड येथे चित्रिकरण केले आहे. गीतकार किरण घाणेकर यांनी गाणं लिहिलं असून हे गाणं गायक केवल वलंज आणि सोनाली सोनवणे यांनी गायले तसेच संगीतकार तेजस पडावे यांनी उत्तम संगीताची साथ दिली. या गाण्याचे छायाचित्रीकरण सचिन चिलाप व अमित खंडागळे यांनी केलेले आहे. यामध्ये प्रमुख भूमिका प्रिया सरकाटे, राहुल रेड्डी यांनी साथ निभवली. या गाण्याचे दिग्दर्शक शुभम गायकी, अजित गाडे, प्रकाशित झालेलं गाणं मनाचा सुटलाय ताबा गो, या गाण्यावर अक्षय ने अतिशय सुंदर नृत्य केल्यामुळे त्याला सन्मानित करण्यात आलेले आहे. अक्षय चौधरी यांची यशाची ही पहिली मराठी सिनेसृष्टीत असून समोर प्रसिद्ध नृत्य दिग्दर्शक होण्याचा होण्याच्या वाटचालीकडे पाऊल टाकले आहे.