महापुरामुळे हजारो लोक बेघर-महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी तर्फे नागपूर जिल्हाधिकारी यांना निवेदन

261
विदर्भ वतन न्युज पोर्टल
कामठी व मौदा तालुक्यातील गांवातील घरांचे नुकसान, महापुरामुळे नदी काठावरील लोक हजारोच्या संख्येने बेघर…
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी तर्फे सरचिटणीस सुरेश भोयर माजी अध्यक्ष जिल्हा परिषद नागपूर यांनी जिल्हाधिकारी यांना नुकतेच निवेदन दिले.
कन्हान नदीच्या महापुरामुळे कामठी व मौदा तालुक्यातील नदीकाठावरील गावातील घरांचे व शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. गावातील अनेक कुटुंबाचे घर पाण्याच्या विसर्गामुळे वाहून गेले असून त्यांनी वर्षभरकरिता उपलब्ध करून ठेवलेले अन्नधान्य सुद्धा वाहून गेलेत. या गरिबांचे खाण्याचे वांदे झाले आहे. त्यांना राहायला घर सुद्धा नाही आहेत हे परिस्थिती निर्माण झालेली आहे.कामठी तालुक्यातील बिना (संगम) वारेगांव, गोरा बाजार, आजनी, आजनी( छोटी ) “गादा, नेरी, उनगाव, सोनेगांव, (राजा ) भामेवाडा, चिकना व तसेच मौदा तालुक्यातील सुकडी, माथनी, मौदा (शहर ) चेहडी, कुंभापूर, नरसाळा, येसंभा, किरणापूर, कोपरा, सिंगोरी, बोरी, कोटगांव, पानमारा, नांदगाव, वांजरा, मोहखेडी, पावडदौना,  वढणा, चिरव्हा, या गावांना मोठ्या प्रमाणात घरांची व शेतीचे नुकसान झालेले आहे. शेतीतील संपूर्ण पिके पुरासोबत नष्ट झाली आहे. पूर्णपणे वाहून गेलेले आहे.
कामठी मौदा तालुक्यातील कन्हान नदी काठावरील गावातील घराचे खूप मोठ्या प्रमाणात घराचे नुकसान झाले आहे. हजारोच्या संख्येने कुटुंब बेघर झाले आहे.आजूबाजूच्या परिसरातील शेतीतील पिके पूर्णतः नुकसान झाले असून कामठी तालुक्यातील अठराशे ते दोन हजार हेक्‍टरच्या वर नुकसान झाले आहे. तसेच मौदा तालुक्‍यातील 6546 हेक्‍टर पेक्षा जास्त शेतजमिनीच्या पिकचे नुकसान झाले आहे.
शासनाने शेतीकरिता प्रति हेक्‍टरी 75 हजार रुपये व ज्यांची घरे पूर्णता नष्ट झालेली आहे त्यांना नवीन घर बांधकाम करण्याकरिता निधी उपलब्ध करण्यात यावे तसेच 50 ते 60 टक्के नुकसान झालेल्या घरांची नुकसान भरपाई देण्यात यावी. या सर्व गावांचे पुनर्वसन करण्यात यावे.  व रायगड जिल्ह्यातील चक्री वादळात नुकसान भरपाई शासनाने दिली. त्याच पार्श्वभूमीवर कामठी व मौदा तालुक्यात सुद्धा नुकसान भरपाई देण्यात यावी. असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस सुरेश भोयर यांनी निवेदनात म्हटले आहे.