प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी योग्य आहार घेणे आवश्यक-निकिता पाटील रामटेके आहारतज्ञ

592
विदर्भ वतन न्युज पोर्टल,
आज आपण ज्या कोरोना काळाचा परिस्थितीला सामोरे जात आहोत ती आपल्याला डारविनियन इव्हलिव्हशनरी थेअरी जी म्हणजे ‘‘सरवाइवल ऑफ द फिटनेस्’’ चा सिध्दांताची आठवण करुन देते. ज्या व्यक्तिमध्ये रोगप्रतिकारक शक्ती मजबूत आहे. ते व्यक्ति कोविड-१९ विरुध्द उपचारांना चांगला प्रतिसाद देत आहेत. जरी या रोगावर कुठलाही उपचार आजचा परिस्थितीमध्ये उपलब्ध नसेल तरी हा रोग, रोगप्रतिकार शक्ती या रोगाविरूध्द लढा देण्यासाठी मजबूत भूमिका बजावत आहे. कोविड-१९ ची जी परिस्थिती आज आहे, त्यामुळे लोकांमध्ये आपली रोग प्रतिकारक शक्ती विषयी जागरुकता निर्माण झालेली आहे. आपले शरीर आपल्याला आरोग्य संबंधी अत्याधिक किरकोळ विकारांविषयीचे संकेत (लक्षणे) आधीच देते. पण मात्र आपण त्याला सहज किंवा हलकेपणाने घेत असतो. आपले शरीर हे एक मशीन आहे, जे आपण प्रत्येक वेळी त्याला आवडी आणि नापसंतीनुसार अन्नाच्या रूपाने खायला देत असतो आणि त्यानुसार आपण आपल्या आरोग्याच्या प्रत्येक टप्प्यावर याचा परिणाम पाहु शकतो.
हे सत्य आहे की, अन्न हे औषध आहे आणि औषध हे आम्ही कधीही, केव्हाही, आणि कोणत्याही प्रमाणात घेवू शकत नाही, नाही का? म्हणुन अन्न चाणाक्षपणे आणि त्याबद्दल योग्य ज्ञान घेवून खावे. बरेचसे खाद्य पदार्थ व सुपरफुड आहेत जे आपल्याला आपली रोगप्रतिकार शक्ति वाढविण्यासाठी मदत करतात आणि आपल्या शरीराला सूक्ष्मजिवाशी लढण्यासाठी मजबूत करतात. रोगप्रतिकार शक्तिबद्द्ल आपण जेव्हा बोलतोय तेव्हा रोगप्रतिकार शक्ति एका दिवसात किंवा एका रात्री उभारलेली गोष्ट नसून त्यासाठी शरीराला सेलपाईंटवर कठोर परिश्रम करावा लागतो. जर तुम्ही शरीराची आरोग्य, तंदुरूस्ती, प्रतिकारशक्ति वाढविण्यासाठी काम सुरू केले असेल तर तुम्हाला कोणत्या वेळी, कोणत्या प्रकारचा आहार घ्यावा? हे माहित असणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे आपण व्यायाम किंवा कसरत सुरू केली असेल तर आपल्याला कोणता व्यायाम शरीराचा कोणत्या अव्ययांना उपयुक्त आहे आणि किती काळ करणे ही माहित असणे गरजेचे आहे. या सर्व गोष्टी व्यतिरिक्त आणखी बरेच पैलू आहेत जे आपले आरोग्य आणि विकार हाताळण्यासाठी मदद करतात. तरीही आम्ही मानव निर्मीत मार्गदर्शकावर अवंलबून आहोत. जसे गूगल, इंटरनेट, फार्वर्ड केलेल्या मॅसेजच्या स्वरुपात अवलंबून आहोत, जे कदाचित काहींसाठी उपयुक्त ठरत असेल परंतु तुमच्यासाठी पण योग्य असेल? हे आवश्यक नाही.
आपण जे अन्न ग्रहण करतो त्यानुसार आपल्या शरीराच्या जिन्स व्यक्त करतात. आपले शरीर हे एक प्रकारचे इंजिन आहे, ज्यास काळजीपूर्वक इंधन भरणे आवश्यक आहे, जर आपण चुकीचे इंधन आपल्या शरीराचे इंजिनला देवू तर शरीराची इंजिनचे सेल्फ लाइफ कमी करु शकते. ब:याच वेळी आपल्याला योग्य आणि पोष्टिक आहार- सुपरफुड सेवन किती प्रमाणात आणि किती काळ घ्यावा? याचा सल्ला आहारतज्ञ  देत असतात. असंख्य आरोग्य आहारांची माहिती इंटरनेटवर उपलब्ध आहे परंतु ते सामान्यकृत आहार आहेत आणि काहींसाठी कार्य करू शकतात पण सर्वांसाठी नाही. म्हणुन कोणत्याही क्रेष डायट घेण्यापूर्वी आपल्या आहारतज्ञाचा सल्ला घेणे आवश्यक आहे. साधे आजार जसे गॅस तयार होणे, बध्दकोष्ठता आणि आम्लपित्त या गोष्टी नेहमी सहजतेनी घेतली जाते परंतु काही काळानंतर यांचे रुपांतर अल्सर आणि पाईल्स या भयानक आजारामध्ये होवू शकतो. आहारतज्ञाच्या मार्गदर्शनाखाली योग्य वेळी योग्य आहार घेतल्यास अन्न हे आपल्या शरीरावर औषधीचे काम करु शकते आणि विकार दूर करु शकते.
आपल्या माहिती आहे का, अन्न औषधी संवाद आहे ज्यामध्ये बरेच पदार्थ काही औषधांच्या क्रियेत अडथळा आणु शकतात किंवा काही पोषकद्रव्ये शोषूण घेण्यासाठी काही औषधे व्यत्यय आणु शकतात. आपल्या शरीरात अनेक जिन्स आहेत, जे खालेल्या अन्नानुसार स्वत:ला व्यक्त करतात म्हणुन अन्नाची केवळ रसायनिक मुख्य भूमिका नसून शरीराची जीवनशैली आणि सुरक्षा सुधारण्यासाठी मदतगार आहे. जेव्हा आपण प्रतिकार शक्ति वाढविणा:या खाद्य पदार्र्थाबद्दल बोलतो तेव्हा एक लांबलचक यादी आपल्या समोर येते आणि त्यामध्ये जोडण्यासाठी अशी अनेक सुपरफुड्स आहे ज्यात शरीराची प्रतिकारशक्ति सुधारण्यास मुख्य भूमिका ठरते. जसे- क्विनोआ ओट्स, लसुन, दालचिनी, इमस्टिक्स, अक्रोडाचे तुकडे, मेथी बियाणे फ्लेक्ससीड्स, सूर्यफुल बियाणे आणि चिया बियाणे या लहान बियाणांमध्ये परिपूर्ण पोषक तत्व आहेत, म्हणून या खाद्य पदार्थानां सूपरफुड्स म्हटलेल आहे. यापैकी आरोग्य उद्योगात चिया बियाणे-साल्व्हिया हिस्पॅनिका या नांवाने लोकप्रिय आहे. चिया बियाणे हे मुळत: मेक्सिकोमध्ये उत्पन्न होते पण आता आपल्या भारतात सुध्दा चिया बियाण्याचे जवळपास तसेच पोष्टिक गुणधर्म असलेले उत्पादन केले जातात. यात उच्च प्रोटिनयुक्त सामग्रीसह पौष्टिक दाट बियाणे आहेत. चिया बियाण्यामध्ये ओमेगा ३, डायट्री फायबर, उच्च कॅल्शियम, इतर आवश्यक खनिजे आणि जीवनसत्वे हे पर्याप्त प्रमाणात आहेत. या बियाण्यात भरपूर अॅंटी ऑक्सिडेंट आहेत जे आपल्या त्वचेचा आरोग्यासाठी आणि तरुणत्व कायम ठेवण्यासाठी मददगार ठरते. उच्च फायबर हे पाचन क्रिया आणि नियमित बोव्हेल करण्यास मदद करतो. चिया बियाण्यामध्ये जे उच्च लिनोलिक अॅसिड आणि ओमेगा ३, फॅट्स कोलेस्ट्रॉल लेव्हल, रक्तदाब, आणि इन्फलेमेस्न कमी करते, हे इन्सुलेनस रेजिस्टटिन्स् कमी करण्यास मदद करते. चिया बियाण्यामध्ये जे जस्त घटक आहेत. चयापचय आणि सहनशक्तिला चालना देते. यात उच्च लेप्टिनचा प्रमाण असल्यामुळे तग धरण्याची क्षमता आणि भूक नियमित करते. ज्यामुळे वजन घटवण्यास मदद मिळते. चिया बियाणात कॅल्शियम आणि बोरॉनचे प्रमाण हाडांचे आरोग्य राखते. या सुपरफुड्स सोबत बरेच सुपरफुड्स जोडले आहेत. जसे भोपळा बियाणे, एवोकॅडोस, किवी, बेरीस ग्रीनटी, काळे पाने इत्यादी फळे आहे. म्हणून योग्य अन्न प्राशन करणे आणि व्यायाम करणे हे योग्य मार्गदर्शन आणि निरिक्षणाखाली करणे गरजेचे आहेत. जर तुम्हाला कुठलाही सूक्ष्म आजार जरी असला तरी त्याला गंाभिर्याने घेणे आवश्यक आहे आणि त्याचा किरकोळ आजारात रुपांतर होण्यापूर्वी उपचारासाठी योग्य ते सल्लागाराची मदद घेणे आवश्यक आहे. आरोग्य, तंदुरूस्ती आणि मानसिक सामथ्र्यांवर लक्ष केंदी्रत करा जेणे करुन अनेक येणा:या महामारी सारख्या परिस्थितीचा सामना करण्यास सक्षम ठराल. घाबरु नका, सुरक्षित रहा, स्वस्थ रहा, आणि लक्षात ठेवा ‘‘स्वस्थ निवडी-स्वस्थ आपण’’थ निवडी-स्वस्थ आपण’’