Home Breaking News शेतमालाचे मूल्यवर्धन कसे करावे याविषयी प्रात्यक्षिक सादर

शेतमालाचे मूल्यवर्धन कसे करावे याविषयी प्रात्यक्षिक सादर

412 views
0

विदर्भ वतन न्युज पोर्टल, सातारा जिल्हा प्रतिनिधी / पञकार- अतुल धनदास खरात
महात्मा फुले कृषी विद्यापीठ संलग्नित शिक्षण प्रसारक मंडळ संचलित रत्नाई कृषी महाविद्यालयातील कृषी दूत शिवम रमेश डोंबे याने दहिवडी येथे ग्रामीण जागृकता कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत शेतकºयांना शेतमालाचे मूल्यवर्धन कसे करावे याविषयी प्रात्यक्षिक सादर केले. हे प्रात्यक्षिक सादर करताना तेल पिके उदाहरण भुईमूग, सोयाबीन, सूर्यफूल या पिकांपासून तेल काढून त्यांचे मूल्यवर्धन कसे करावे याविषयी माहिती दिली. प्रात्यक्षिक सादर करण्यासाठी शेतकºयांना तेलगिरणीमध्ये भुईमुगाच्या शेंगावरती तेलप्रक्रिया करून तेल कसे वेगळे करावे याचे प्रात्यक्षिक सादर केले. भुईमूग पासून तयार होणारे तेल आणि पेंड विकून तेल पिकाचे मूल्यवर्धन करू शकतो हे याठिकाणी प्रात्यक्षिकाद्वारे सांगण्यात आले. हे प्रात्यक्षिक सादर करताना तेलगिरणीचे मालक विकास मिठारे यांचेही मार्गदर्शन शेतकºयांना लाभले. या प्रात्यक्षिकाचा नक्कीच शेतकºयांना फायदा होईल.
यासाठी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष जयसिंह मोहिते पाटील, महाविद्यालयाचे समन्वयक डॉ. डीपी कोरटकर, महाविद्यालयाचे प्राचार्य आऱजी़ नलवडे कार्यक्रम समन्वयक प्रा़ एस. एम़ एकतपुरे, कार्यक्रम अधिकारी प्रा. डी. एस. मिटकरी तसेच प्रा. एस. आऱ आडत यांचे मार्गदर्शन लाभले. विषय तज्ञ म्हणून प्रा.एन.बी गाढवे यांचे मार्गदर्शन लाभले. हे प्रात्यक्षिक सादर करताना परिसरातील शेतकरी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.