
विदर्भ वतन,नागपूर – राष्ट्रीय जनसुराज्य पार्टीतर्फे राष्ट्रीय अध्यक्ष राजेश बा.काकडे यांनी पुरामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करून भामेवाडाख, कामठी येथील अनेक गरजुंना धान्याचे व नित्योपउपयोगी साहित्याच्या कीट वाटप केले़ त्या किटमधे तांदूळ, गहू, तेल असा15 दिवसांचा किराणा, चादर, ब्लान्केट अशा इत्यादी प्रकारचे साहित्य देण्यात आले़ यावेळी राष्ट्रीय जनसुराज्य पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष राजेश बा काकडे, राष्ट्रीय सदस्य जैनहुला शाह, राष्ट्रीय सदस्य प्रवीण उराडे, राष्ट्रीय सदस्य अजय शर्मा, नागपूर ग्रामीण अध्यक्ष रोशन शाहू, कामठी विधानसभा अध्यक्ष जितेंद्र भालेराव, कामठी तालुका अध्यक्ष संजय अंबाडकर, वडोदा पंचायत समिती अध्यक्ष सोपान वानखेडे व कुही तालुका अध्यक्ष हेमंत काकडे व सदस्यगण आशिष चौधरी तसेच सर्व गावकरी मंडळी उपस्थित होते.

