
विदर्भ वतन,नागपूर – नागपुर शहरातील सुप्रसिद्ध स्वर्गीय कस्तुरचंद डागा यांनी नागपूरकरांना दिलेली भेट म्हणजे कस्तुरचंद पार्क़ मागील २०१६ पासुन नागपूर मेट्रोचे कामकाज सुरू आहे़ कस्तुरचंद पार्कला डंम्पींग गोडाऊन समजुन त्याचा वापर डंम्पीग म्हणुन करत आहे. ज्यामुळे मैदानामध्ये नागरिकांना खेळण्याची तसेच फिरण्याची असुविधा होत आहे़ कस्तुरचंद पार्क हि देशाची हॅरिटेज संपत्ती आहे़ ज्याचे सौंदर्यीकरण डावलून कोणत्याची प्रकारची मोडतोड करून नुकसान पोहचवु शकत नाही़ तरिपण नागपूर मेट्रोचे व्यवस्थापन आणि हॅरिटेजचे पदाधिकारी यांनी मिळुन कस्तुरचंद पार्कच्या इमारतीला नुकसान पोहचविण्याचा प्रयत्न केला़ त्यामुळे नागपुर उच्च न्यायालयाच्या मुंबई खंडपिठामध्ये दाखल केलेली आहे़ नुकतेच या कार्याचे निरिक्षण करण्यासाठी आर. के देशपांडे वरिष्ठ न्यायाधिश, पुष्पा गनेडीवाला न्यायाधिश, नागपुरातील उच्च न्यायालय मुंबई खंडपिठ यांनी भेट दिली़ त्याचवेळी राष्ट्रीय जनसुराज्य पार्टीच्यावतीने पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष राजेश काकडे हे सुध्दा उपस्थित होते. राजेश काकडे यांनी नागपुर मेट्रोच्या अतिक्रमणाचे नुकसान समितीपुढे मांडले़ तसेच पुढील काही मुद्दे निदर्शनास आणून दिले़ निवेदन मा. न्यायाधिश मोहदय यांच्या नावानी एक निवेदन असिस्टन रजिस्टर नागपुर ब्रांचला पाठविण्यात आले आहे. ज्यामध्ये राजेश काकडे यांनी खालील मागण्या केल्या आहे की, नागपुर मेट्रोला कस्तुरचंद पार्कची जागा उपलब्ध होऊ न देने,मेट्रोनी जागेचे अनाधिकृत पध्दतीने जो अतिक्रमण केले आहे त्याला नष्ट करणे, जनतेच्या स्वास्थासाठी संपुर्ण मैदान यांची देखरेख तसेच जनतेने अपल्या स्वास्थ सुरक्षित राखण्यासाठी कस्तुरचंद पार्क या मैदानाचा आनंद घेता यावा यासाठी मैदान राखण्यात यावे, कस्तुरचंद पार्क हॅरिटेज संपत्ती असल्याने त्याची देखरेख करून जुनी वास्तू कायम ठेवणे तसेच सुरक्षा आणि देखभाल करण्याची जबाबदारी म. न. पा. या स्थानिय जनता कमिटीला सोपविण्यात यावी, कस्तुरचंद पार्कमध्ये देशाचे प्रधानमंत्री आणि राष्ट्रीय नेते येतात़ त्यांच्या सुरक्षेला धोका निर्माण होवु शकतो, त्यामुळे नागपुर मेट्रोचे स्टेशन तिथुन हटवायलाच पाहिजे अशी मागणी राष्ट्रीय जनसुराज्य पार्टी द्वारे करण्यात आली आहे. तसेच राज्याचे पर्यटन मंत्र्यांनी याकडे लक्ष द्यावे अशी मागणी करण्यात आली आहे. हे निवेदन देते वेळी पार्टी चे विदर्भ अध्यक्षा अनिता भिवगडे, पुर्व नागपुर अध्यक्ष रोशन शाहु, प्रसिध्दी प्रमुख शिवप्रसाद राऊत, जनाब जैनउल्ला शाह, अजय शर्मा, पार्टीचे राष्ट्रीय महासचिव चंद्रभानजी रामटेके, राष्ट्रीय कार्यकारीणी अध्यक्ष प्रिती डंभारे उपस्थित होते.

