Home Breaking News शेतक-यांना ठिबक सिंचन प्रकल्प विषयावर माहीत

शेतक-यांना ठिबक सिंचन प्रकल्प विषयावर माहीत

125 views
0

सातारा जिल्हा प्रतिनिधी
पञकार- अतुल धनदास खरात
महात्मा फुले कृषी विद्यापीठ संलग्नित शिक्षण प्रसारक मंडळ संचलित रत्नाई कृषी* महाविद्यालयातील कृषी दूत शिवम रमेश डोंबे याने दहिवडी येथे ग्रामीण जागृकता कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत शेतकऱ्यांना ठिबक सिंचनाविषयी माहिती दिली. तसेच ठिबक सिंचनाचे विविध भाग यांची माहिती दिली. त्यासोबतच ठिबक सिंचनाचे महत्त्व पटवून त्याची उपयुक्तता याची माहिती दिली. त्याचबरोबर ठिबक सिंचनाचे फायदे, ठिबक सिंचनासाठी होणारा खर्च व व त्याची देखभाल याची माहिती दिली. तसेच सरकारद्वारे अवलंबिल्या जाणाऱ्या सिंचन योजनेची माहितीही याठिकाणी देण्यात आली. सिंचनाने होणारी पाण्याची बचत यामुळे ठिबक सिंचन विषयी केलेले मार्गदर्शन नक्कीच शेतकऱ्यांना उपयुक्त ठरेल
यासाठी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष जयसिंह मोहिते पाटील, महाविद्यालयाचे समन्वयक डॉ. डीपी कोरटकर, महाविद्यालयाचे प्राचार्य आर जी नलवडे कार्यक्रम समन्वयक प्रा एस. एम एकतपुरे, कार्यक्रम अधिकारी प्रा. डी. एस. मिटकरी तसेच प्रा. एस. आर्. आडत यांचे मार्गदर्शन लाभले. विषय तज्ञ म्हणून एम. एम.चंदनकर यांचे मार्गदर्शन लाभले. हे प्रात्यक्षिक सादर करताना परिसरातील शेतकरी उपस्थित होते.