सातारा जिल्हा प्रतिनिधी, विदर्भ वतन 
पञकार-विशाल महादेव गुरव
महात्मा फुले कृषी विद्यापीठ संलग्नित शिक्षण प्रसारक मंडळ संचलित रत्नाई कृषी महाविद्यालयातील कृषी दूत शिवम रमेश डोंबे याने दहिवडी येथे ग्रामीण जागृकता कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत शेतकऱ्यांना बीज प्रक्रियेचे प्रात्यक्षिक सादर करून दाखवले.. हे प्रात्यक्षिक सादर करताना बीज प्रक्रिया चे महत्व पटवून सांगितले. त्याचसोबत जैविक व रासायनिक बीज प्रक्रिया कशा पद्धतीने करावी याचे प्रात्यक्षिक सादर केले. बी पेरणी नंतर जमिनीत असणारे कीटक व बुरशी यांच्या प्रादुर्भावाने पिकांच्या वाढीवर परिणाम होतो परिणामी उत्पादनात घट येते. उत्पादनात होणारी घट यामुळे शेतकऱ्यावर संकट ओढवू शकते *हे संकट टाळण्यासाठी बीजप्रक्रिया करणे अत्यंत गरजेचे आहे. रासायनिक प्रक्रिये ऐवजी जैविक बीज प्रक्रिया वापर करण्याचा सल्लाही यावेळी कृषीदूताने दिला.
यासाठी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष जयसिंह मोहिते पाटील, महाविद्यालयाचे समन्वयक डॉ. डीपी कोरटकर, महाविद्यालयाचे प्राचार्य आर जी नलवडे कार्यक्रम समन्वयक प्रा एस. एम एकतपुरे, कार्यक्रम अधिकारी प्रा. डी. एस. मिटकरी तसेच प्रा. एस. आर्. आडत यांचे मार्गदर्शन लाभले. विषय तज्ञ म्हणून प्रा. डी. एस. ठवरे यांचे मार्गदर्शन लाभले. हे प्रात्यक्षिक सादर करताना परिसरातील शेतकरी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published.

You missed