बेलापूर एज्युकेशन सोसायटीचे कला व वाणिज्य महाविद्यालयात शिक्षक दिन साजरा

280

अक्षय तेलोरे, विदर्भ वतन प्रतिनिधी अहमदनगर ,बेलापूर- बेलापूर एज्युकेशन सोसायटीचे कला व वाणिज्य महाविद्यालयात डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस 5 सप्टेंबर हा दिवस शिक्षक दिन म्हणून साजरा करण्यात आला.शासकीय नियम पाळून व सामाजिक आंतर राखून शिक्षकांचे सत्कार करण्यात आले.त्यामधे प्रभारी प्राचार्य डॉ. गुंफा कोकाटे यांचा सत्कार बेलापूर एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष गणपतशेठ मुथ्था यांनी केला.सचिव अँड .शरद सोमाणी यांनी प्रा.विलास गायकवाड यांचा सत्कार केला.तसेच महाविद्यालय विकास समितीचे चेअरमन राजेश खटोड यांनी प्रा.सुनिल विधाटे यांचा सत्कार केला.संचालक बापूसाहेब पूजारी यांनी डॉ. अशोक माने यांचा सत्कार केला..संचालक नंदूशेठ खटोड यांनी प्रा.प्रकाश देशपांडे व प्रा.सतिश पावसे यांचा सत्कार केला.तसेच कार्यालयीन अधिक्षक संदेश शाहिर व क्रुष्णा महाडिक यांचा सत्कार सचिव शरद सोमाणी यांनी केला आहे..बेलापूर एज्युकेशन सोसायटीचे शिक्षक प्रतिनिधी गुणवंत शिक्षक अनिल तायडे सर यांनी कनिष्ठ महाविद्यालयाचे बोर्डलेखन पेंट केल्याबद्दल त्यांचा अध्यक्ष व पदाधिका-यांच्या समवेत शाँल ,गुलाब पुष्प व पेन देऊन सत्कार करण्यात आला..कार्यक्रमाची सुरुवात डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमापूजनाने झाली..सचिव अँड.शरद सोमाणी यांनी प्रास्ताविक केले..बापूसाहेब पूजारी यांनी शिक्षकदिनाचे महत्व सांगितले..कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्र. प्राचार्य डॉ. गुंफा कोकाटे यांनी केले.प्रा.प्रकाश देशपांडे यांनी आभार मानले.राष्ट्र सह्याद्री वाहिनीवर डॉ. गुंफा कोकाटे यांनी शिक्षकदिनाचे व शिक्षकांचे महत्त्व पटवून दिले. प्रा.प्रकाश देशपांडे यांनी राष्ट्र सह्याद्री वाहिनीवर शिक्षक म्हणून कसे घडलो या अनुभवांची मांडणी केली.संयोजन विद्यार्थी विकास मंडळाचे समन्वयक प्रा.संजय नवाळे यांनी केले़