Home Breaking News ग्रामीण जागृकता कार्यानुभव कार्यक्रमाची सुरुवात

ग्रामीण जागृकता कार्यानुभव कार्यक्रमाची सुरुवात

272 views
0

सातारा जिल्हा प्रतिनिधी.
पत्रकार-विशाल गुरव
महात्मा फुले कृषी विद्यापीठ शिक्षण प्रसारक मंडळ संचलित,रत्नाई कृषी महाविद्यालयातील कृषीदूतांनी दहिवडी येथे ग्रामीण जागृकता कार्यानुभव कार्यक्रमाचे आयोजन केले यासाठी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष जयसिंह मोहिते पाटील, महाविद्यालयाचे समन्वयक डॉ. डी पी कोरटकर ,महाविद्यालयाचे प्राचार्य आर जी नलवडे कार्यक्रम समन्वयक प्रा.एस एम एकतपुरे, कार्यक्रमाधिकारी प्रा.डी एस मिटकरी तसेच विषयतज्ञ म्हणून प्रा एस आर आडत यांचे मार्गदर्शन लाभले.
प्रात्यक्षिक सादर करताना परिसरातील शेतकरी उपस्थित कृषीदूत शिवम रमेश डोंबे यांनी शेतकऱ्यांना माती परीक्षणाचे महत्व पटवून देऊन माती परीक्षण कसे करावे याविषयी प्रात्यक्षिक सादर केले हे माती परीक्षण करताना माती परीक्षणासाठी चे नमुने कसे घ्यावे या विषयी मार्गदर्शन केले तसेच शेतकऱ्यांचे मातीचे नमुने तपासून दिले.