Home Breaking News आर्थिक संकटाने घेतला सलून व्यावसायिकाचा बळी

आर्थिक संकटाने घेतला सलून व्यावसायिकाचा बळी

122 views
0

विदर्भ वतन न्युज पोर्टल,नागपूर – कोरोना काळात सर्वत्र दैनावस्था झालेली आहे़ कुटुंबाच्या उदरनिर्वाहाच्या प्रश्नानंतर काही प्रमाणात दुकाने/ प्रतिष्ठाने सुरू करण्याची परवानगी शासनाने दिली असली तरी मात्र हवा तो आर्थिक आधार व्यावसायिकांच्या हातात मिळत नाही ही सत्य स्थिती आहे़ या उदासिनतेचा फटका आज सलून व्यावसायिकाला बसला व त्याने यातच आपली जीवनयात्रा संपविली़
पिपळा,नागपूर येथे राहणारे सलून व्यावसायिक शैलेष लक्षणे (वय ४०) यांनी आज मंगळवारी सकाळी १० वाजेच्या दरम्यान बेसा येथे असलेल्या दुकानाच्या वरच्या भागात असलेल्या रिकाम्या खोलीत गळफास घेत आत्महत्या केली़ मागील अनेक दिवसांपासून सलून दुकाने सुरू असली तरी फक्त कटींग करण्यालाच परवानगी देण्यात आली आहे़ दाढी करणे किंवा इतर कामांंना परवानगी नसल्यामुळे हवा तसा उद्योग होत नव्हता़ त्यामुळे आर्थिक नुकसानीचा फटका बसलेला होता़ मागील अनेक दिवसांपासून मानसिक तणावाखाली त्यांनी आज टोकाचे पाऊल उचलले़ त्यांच्या पश्चात पत्नी व मुले आहेत़ घरचा करता पुरूष अचानक गेल्यामुळे कुटुंंंबावर दुखाचा डोंगर कोसळलेला आहे़ या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे़