विदर्भ वतन / नागपूर (प्रतिनिधी) : विदर्भातील पंढरपूर मानले जाणारे श्री क्षेत्र पारडी (नगाजी), ता. हिंगणघाट जिल्हा वर्धा येथे यंदा गोकुळाष्टमी उत्सव कोरोना संसर्गाचा फैलाव होऊ नये या कारणामुळे रद्द करण्यात येत असल्याचे विस्वस्ताकडून जाहिर करण्यात आले आहे. तसेच दिनांक १४ आॅगस्ट रोजी भरणारी गोकुळाष्टमी यात्रा आणि दहीहांडीचा कार्यक्रमसुध्दा रद्द करण्यात येत असून या यात्रेशी जुळलेले श्रध्दाळू भक्तांनी कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी हा उत्सव आपआपल्या घरीच उत्साहात साजरा करावा असे आवाहन विश्वस्त मंडळी गोपालकृष्ण देवस्थान, पारडी जि. वर्धा तर्फे करण्यात आले आहे.

