जवाहर गुरुकुल इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेजचे नेत्रदिपक यश

288
विदर्भ वतन / नागपूर (प्रतिनिधी) :  श्री शास्त्री शिक्षण संस्था द्वारा संचालित जवाहर गुरुकुल इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेज, नंदनवन या शाळेचा सत्र २०१९-२० च्या शालांत परीक्षेचा निकाल १०० टक्के लागला. यात प्रसन्न वानखाडे याने ८९.८० टक्के गुण प्राप्त करून प्रथम क्रमांक पटकाविला, सानिका काशीकर हिने ८६.६० टक्के गुण प्राप्त करून द्वितीय क्रमांक, नयन हटवार याने ८२.४० टक्के गुण प्राप्त करून तृतीय क्रमांक प्राप्त केला. याच सोबत महक खान हिने ८०.८० टक्के गुण प्राप्त करून चतुर्थ क्रमांक व दिपाक्षी बुराडे हिने ८० टक्के गुण प्राप्त करून पाचवा क्रमांक पटकावला.
या विद्यार्थ्यांनी प्राविण्य मिळवून नेत्रदीपक यशाची परंपरा कायम ठेवली आहे. विद्यार्थ्यांनी मिळालेल्या घवघवीत यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष अशोक मानकर, माजी आमदार,सचिव डॉ. श्री दिलीप सेनाड, कोषाध्यक्ष डॉ. बाबासाहेब नंदनपवार, गुरुकुलाच्या पालक प्रगती मानकर, संस्थेच्या सदस्या अंकिता मानकर-वैद्य, प्राचार्य संजय रक्षिये व सर्व शिक्षकांनी कौतुक केले.