कुर्वेजचा हिमांशू दृष्टीअक्षम विद्यार्थ्यांमधून राज्यात दुसरा

313

विदर्भ वतन / नागपूर (प्रतिनिधी) : दहावी बोर्डाच्या घोषित झालेल्या निकालामध्ये कुर्वेज न्यू मॉडेल हाय. व ज्युनिअर कॉलेज, श्रद्धानंदपेठचा निकाल १०० टक्के लागला असून हिमांशू बोकडे ९२ टक्के गुण घेत दृष्टीअक्षम विद्यार्थ्यांमधून महाराष्ट्रातून दुसरा तर विदभार्तून पहिला आला. तर याच शाळेची वेदिका गेडाम ८९.६० टक्के गुण घेत विदर्भातूून दुसरी आली आहे. इतर गुणवत्ता प्राप्त विद्यार्थ्यांमध्ये रोहित शिंपी ८७.४०, आदित्य पाटील ८७.२०, श्रृती हरडे ८५.६० तसेच अपंग विद्यार्थ्यांमधून आशिष पवार ८१ टक्के, पल्लवी वानखेडे ८०.४०, तृप्ती येसकर ७५ टक्के. सामान्य विद्यार्थ्यांमधून स्वाती वानखेडे ७० टक्के ,निकीता भैसने ६९ टक्के, कशिश बावनगडे याने ६८ टक्के गुण मिळवित शाळेच्या उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम राखली. शाळेचा निकाल १०० टक्के लागला असून ४२ पैकी १७ विद्यार्थी ७५ च्या वर विशेष गुणश्रेणीत तर प्रथम श्रेणीत १२, द्वितीय श्रेणीत ७ व सामान्य श्रेणीत ६ विद्यार्थी पास झाले आहेत.
याप्रसंगी विदभार्तून प्रथम व द्वितीय आलेल्या हिमांशू बोकडे व वेदिका गेडाम यांचा शाळेच्या मुख्याध्यापिका संगीता उगे यांचे हस्ते पुष्पगुच्छ देऊन व पेढा भरवून सत्कार करण्यात आला. हिमांशू व वेदिकाने मुख्याध्यापिका व शाळेतील शिक्षकांनी वर्षभरात सहा सराव परीक्षा घेतल्यानेच आम्हाला यशाचं शिखर गाठता आल्याचे आनंदोद्गार काढत शिक्षकांचा आशीर्वाद घेतला.