Home Breaking News कीर्ती गिरहे ९१.८ टक्के गुण घेऊन उत्तीर्ण

कीर्ती गिरहे ९१.८ टक्के गुण घेऊन उत्तीर्ण

100 views
0

विदर्भ वतन / नागपूर (प्रतिनिधी) : माध्यमिक प्रमाणपत्र परिक्षेत बालाजी कॉन्व्हेंट पब्लिक स्कूल, जुना सुभेदार येथील कीर्ती गिरहे हिने ९१.८ टक्के उत्तीर्ण श्रेणी गाठली. या यशाबद्दल तीचे सर्वत्र कौतुक होत आहे. या यशाचे श्रेय तीने मुख्याध्यापक विजय तांबूलकर, शिक्षिका सुधा इंगळे, मनीषा झलके, अर्पना वांदे, भावना सिसोदिया, रूपाली घोंगे, सोफिया जोसेफ तसेच आई वडिलांना दिले.
या विद्यार्थीनीची घरची परिस्थीती अत्यंत बेताची असताना देखील उच्च गुणसह उत्तीर्ण झाल्याबद्दल ती एक आदर्श विद्यार्थीनी ठरली. सर्व स्तरातून तिच्या या यशाबद्दल अभिनंदन आणि आशिर्वादाचा वर्षाव होत आहे. डॉ. पंजाबराव देशमुख राष्ट्रीय शिक्षक परिषदेचे नागपूर विभागीय अध्यक्ष संजय निंबाळकर यांनी तीचे संघटनेच्या वतीने अभिनंदन केले.