Home Breaking News आर.के. हायस्कूल पुलगावची उत्तुंग भरारी

आर.के. हायस्कूल पुलगावची उत्तुंग भरारी

43 views
0

विदर्भ वतन / नागपूर (प्रतिनिधी) : वर्धा जिल्ह्यातील पुलगाव येथील आर. के. हायस्कूलचा एसएससी मार्च २०२० चा निकाल नेत्रदिपक ठरला. या वर्षात ९९.३४ टक्के निकाल घेणारे हे विद्यालय यशाचे मानकरी ठरले. एकूण ३०६ विद्यार्थी परिक्षेला बसले होते. करण संजय पटिले हा विद्यार्थी ९५ टक्के गुण घेवून अव्वल आला. तर सपना सज्जन पांडे, ९४.६०, पल्लवी किशोर पटने ९३.४०, चिन्मय प्रविण गावंडे ९३.२०, तेजस्विनी सुरेशराव पांडे ९३.२०, बादल सुमेधराव लोणपांडे ९३, गौरी सुरेश कुत्तरमारे ९२.२०, खुशी अशोक बोकडे ९२.२०, अनुश्री प्रविण कुंभारे ९१.२०, वैष्णवी हरिचंद परदेशी ९०.२०, संकेत गौतम हुमणे ९०.२० आणि स्रेहा महेंद्र गजभिये ९० असे गुणांक प्राप्त करणारे विद्यार्थी आहेत. या यशाबद्दल शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकोत्तर कर्मचारी विद्यार्थ्यांचे पाल्य यांनी त्यांचे अभिनंदन करून भावी वाटचालीकरीता शुभेच्छा दिल्या.