Home Breaking News अमित हायस्कुलची सलोनी मोटघरे अव्वल

अमित हायस्कुलची सलोनी मोटघरे अव्वल

76 views
0

विदर्भ वतन / नागपूर (प्रतिनिधी) : स्व. अमित नखाते संचालीत अमित इंग्लीश व मराठी हायस्कुल या शाळेतील माध्यमिक शालांत परिक्षा मार्च २०२० च्या परीक्षेला हायर इंग्रजी माध्यमाचे ४९ विद्यार्थी व सेमी इंग्रजी माध्यमाचे १३४ विद्यार्थी परीक्षेला बसलेले होते. शाळेचा निकाल १०० टक्के लागलेला असुन १२ विद्यार्थी गुणवत्ता प्राप्त आहेत. यात सलोनी मोटघरे ९८ टक्के उन्नती खंते ९५, हषिदा हरणे ९५, सौरभ हेइळकर ९४, अनुपम पांडे ९४, अनुष्का सेलोकर ९३, सुहानी गिरीपुंजे ९२, पियुष हेडाऊ ९२, सिध्दी कडुकर ९१, हर्ष काळबांडे ९२, अरोमा केन ९०, रचना आंबुलकर ९० यांचा समावेश आहे. गुणवंत विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष शंकरराव नखाते, सचिव ताराबाई नखाते, कोषाध्यक्ष मधुकर डोये, सचिव आशिष नखाते, उपाध्यक्ष रमण खरे, सोमु राघौते, मुख्याध्यापक प्रमोद कडुकर, यांनी अभिनंदन केले पुढील भविष्याची वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.