जिल्हाधिकार्यांच्या माध्यमातून सीमेवर पाठविल्या राख्या

398

विदर्भ वतन / नागपूर (प्रतिनिधी) : सीमेवर अहोरात्र पहारा देवून देशाचे संरक्षण करणार्या सैनिकांसाठी नागपूरकरांनी उपजिल्हाधिकारी यांच्या माध्यमातून राख्या पाठवून त्यांच्या कार्याला सलाम केला. मागील १५ वर्षांपासून हा उपक्रम नागपुरकर राबवित आलेले आहेत. या उपक्रमासाठी नागपूरकर या संस्थेचे संयोजक निखिल भुते यांच्या पुढाकाराने नागपूरातील सामाजिक, आध्यात्मिक, महाविद्यालयीन, सांस्कृतिक, क्रिडा व सैनिकी संघटनाच्या संकल्पनेतुन भारत-चीन (लद्दाख गलवान घाटी) वरिल जवानासाठी नागपुरकरांच्या वतीने नागपुर महाराज श्रीमंत डॉ. राजे मुधोजी भोसले यांच्या हस्ते नागपुरचे उपजिल्हाधिकारी रविंद्र खजांजी यांच्या माध्यमातुन राख्या पाठविण्यात आल्या. याप्रसंगी तायवाडे कॉलेज आॅफ फार्मसी प्राचार्य विक्रांत चिलाटे, विदर्भ फार्मसी असो. अभिजीत दरवडे, पतंजलि योग समितीचे पंकज बांते, भावना चौधरी, माजी सैनिक मोहनजी वैरागडे, तायवाडे कॉलेज आॅफ फार्मसीचे सागर त्रिवेदी, निखिल भुते, रूपक भुतडा, वैष्णवी भुरे, सुनंदा भुते, नाजमीन असारी, साई कुशाल गोंडाने, रूपक भुतडा व अन्य सामाजिक, आध्यात्मीक, महाविद्यालयीन, सांस्कृतिक, क्रिडा व सैनिकी संघटनाचे पदाधिकारी सहभागी झाले होते. यावेळी नागपूरकरां तर्फे मिसेस नागपुर विजेता प्रविणा दाढे उपजिल्हाधिकारी, रविंद्र खजांजी यांना राखी बांधून दीर्घायुष्याच्या शुभेच्छा दिल्या.