Home Breaking News पिवळी मारबत उत्सव १९ आॅगस्टला

पिवळी मारबत उत्सव १९ आॅगस्टला

148 views
0

 विदर्भ वतन / नागपूर (प्रतिनिधी) : कोरोणामुळे उद्भवलेल्या लॉकडाऊनच्या पार्श्वभुमिवर यंदा मारबत उत्सव होणार की नाही हा संभ्रम कायम असता मारबत नागोबा देवस्थान तर्हाणे तेली समाजच्या वतीने पिवळी मारबत येत्या १९ आॅगस्टला काढली जाणारच असे स्पष्ट करण्यात आले. या परंपरेला ऐतिहासीक परंपरा असल्याने नागपुरकरांच्या भावना त्यासोबत जुळलेल्या आहेत. स्वातंत्र्य लढ्यात तर्हाने समाजाचा मोठा वाटा असल्याचे प्रसिध्दी पत्रकातून समितीचे अध्यक्ष प्रकाश गौरकर, सचिव विजय खोपडे आणि कोषाध्यक्ष देविदास गभणे यांनी म्हटले आहे. यावर्षी उत्सवाचे १३६ वे वर्ष आहे.