मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य अभियानाला वर्धेतून सुरूवात

154

विदर्भ वतन / वर्धा (प्रतिनिधी) : शिवसेना पक्ष प्रमुख तथा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त सेलू तालुक्याच्या वतीने भव्य अभियानाला शिवसेना वर्धा जिल्हा प्रमुख अनिल देवतारे यांच्या प्रमुख उपस्थितीत सुरूवात करण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराज आणि शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेचे पूजन करून तसेच पक्षाचे ध्वजारोहण करून अभियान आरंभ करण्यात आले. या अभियानात शिवसेना सदस्य नोंदणी, वृक्षारोपण, रक्तदान शिबीर, रुग्णांना फळ वाटप, गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार असा सात दिवसाचा उपक्रम राबविण्यात येणार आहे.
या अभियानाची सुरुवात करतेवेळी शिवसेना सेलू तालुका प्रमुख सुनील पारसे, तालुका संघटक योगेश इखार, उप तालुका प्रमुख अमित बाचले, उप तालुका प्रमुख किशोर खडतकर, सेलू शहर प्रमुख गणेश कुकडे, सिंदी शहर प्रमुख मंगेश महुरे, युवा सेना सेलू तालुका अधिकारी प्रशांत झाडे, युवा सेना सेलू तालुका सचिव रोशन वांदीले, युवा सेना सेलू शहर प्रमुख विक्की पवार, झडशी सर्कल प्रमुख चेतन घोडकांदे, कोटांबा शाखा प्रमुख रोशन बेंडे, कान्हापुर शाखा प्रमुख प्रवीण साटोने, गणेशपुर शाखा प्रमुख सूरज गांधामवर, वडगाव कला शाखा प्रमुख सुनील तीमांडे, सेलडोह शाखा प्रमुख कान्हा धोंगडे, शिरसमुद्रपुर शाखा प्रमुख प्रशांत गोहने, युवा सेना शाखा प्रमुख सेल्डोह अभय चांदेकर, वाहतूक सेना सेलडोह शाखा प्रमुख आयाफझ सय्यद, धीरज लाडिस्कर, सचिन राऊत , गजु तिमांडे, तसेच बरेच शिवसैनिक युवा सैनिक उपस्थिती होते.