विदर्भ वतन / वाडी (प्रतिनिधी) : परिसरातील दवलामेटी येथे दूषित पाणीपुरवठ्यामुळे जनतेच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. आधिच कोरोनाच्या दहशतीत जगत असलेल्या लोकांना दूषित पाण्यामुळे अनेक आजार जडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे संबंधित प्रशासनाने तत्काळ स्वच्छ पाणी पुरवठा करावा अशी मागणी सबस्टेशन वेना वाडी येथे पंचायत समिती सदस्य सुधीर करंजीकर, वंचित बहुजन आघाडी शहराध्यक्ष सुरज वानखेड, तालुकाध्यक्ष अतुल शेंडे, संघटक रोहित राऊत, उपाध्यक्ष नितीन रामटेके, कोषाध्यक्ष स्वप्निल चारभे आणि विक्की भारशंकर यांनी केली.

