रात्रकालीन शिक्षकांनी कायम करा

173

विदर्भ वतन / नागपूर (प्रतिनिधी) : गत अनेक वर्षांपासून रात्र शाळेत अनेक शिक्षक कार्य करत आहेत. त्यांना पदरी शिक्षण विभागाकडून सातत्याने उपेक्षाच पडत आलेली आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन या शिक्षकांना कायम स्वरूपी नोकरीत सामावून घेण्यात यावे अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश कॉंगे्रस कमिटीचे सरचिटणीस प्रा. प्रकाश सोनवणे यांनी शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांचेकडे केली आहे. जी मुल पोट भरण्यासाठी दिवसभर काम करतात मात्र, शिक्षणाची ओढ असल्यामुळे त्यांची फरफट थांबण्यासाठी रात्रकालीन शाळांची संकल्पना पुढे आली. त्यामुळे अनेक नोकरदार आणि दिवसा काम करून रात्री शिक्षण पुर्ण करणार्यांची संख्या कमी नाही. शिक्षणदान देणारे शिक्षकही यात मागे कसे राहणार, त्यांनी सुध्दा अशा विद्यार्थ्यांची जिद्द पाहून रात्रकालीन शाळेत आली सेवा देणे आरंभ केले. मात्र अनेक वर्ष विद्यादान करूनही शिक्षण विभागाकडून त्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न सोडविण्यात आला नाही. ही एक गंभीर बाब आहे. त्यामुळे राज्याच्या शिक्षण मंत्रालयाकडून या शिक्षकांची दखल घेवून त्यांना नोकरीत सामावून घेण्यात यावे अशी मागणी सोनवणे यांनी केली.