पोलिस नायक सुमित राठोड यांना प्रतिष्ठेचा ‘कर्मवीर’ पुरस्कार जाहीर

181
विदर्भ वतन /वाशिम-मानोरा (प्रतिनिधी) :  साईनिर्मल फाउंडेशन भुसावळ या संस्थेतर्फे दिला जाणारा ‘कर्मवीर’ हा राज्यस्तरीय पुरस्कार यंदा सुमित राठोड यांना देण्यात येत असल्याचे जाहीर करण्यात आला आहे. कोरोना काळातील उल्लेखनिय कार्याबद्दल त्यांची दखल घेऊन या पुरस्कारासाठी त्यांची निवड करण्यात आली.
कोरोनामुळे देशभरात लॉकडाऊन घोषीत करण्यात आला. या काळात अनेकांच्या नोकर्या, रोजगार, धंदे बुडाल्यामुळे प्रचंड प्रमाणात बेरोजगारी वाढली. मात्र, आपल्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न अत्यंत प्रखरतेने पुढे आला. ही गरज भागविण्यासाठी सरकारचे हात कमी पडले त्यामुळे अनेकांनी लॉकडाऊनला न जुमानता हाताला काम मिळावे आणि कुटूंबाचा उदरनिर्वाह करता यावा यासाठी घराबाहेर पडले. तर कोरोनाचा फैलाव होवू नये यासाठी आरोग्य तज्ज्ञांच्या मार्गदर्शक तत्वानुसार शासनाने लोकांना घराबाहेर न पडण्याच्या सूचना दिल्या. लोकांना घराबाहेर पडण्यापासून अटकाव करण्यासाठी प्रशासनाने पोलिसांना मोकळीक दिली. त्यामुळे या अदृष्य विषाणूचा मुकाबला करण्यासाठी कोणतीच यंत्रणा अस्तीत्वात नसल्यामुळे पोलिसांच्या खांद्यावरचा ओझा वाढला अहोरात्र परिश्रम घेऊन कर्तव्यावर असलेल्या पोलिसांनी लॉकडाऊन यशस्वी करून दाखविला मात्र, अनेक पोलिसांना आपल्या प्राणााची आहुती द्यावी लागली.
अशाच प्रकारे आपले कर्तव्य प्रामाणीकपणे बजावणार्या पोलिसांना भुसावळ येथील साईनिर्मल फाउंडेशनने ‘कर्मवीर’ पुरस्कार देवून गौरवान्वीत केले आहे. यात पोलिस नायक सुमित राठोड यांच्या कार्याचा आलेख उल्लेखनीय असल्यामुळे त्यांना हा पुरस्कार जाहिर करण्यात आला आहे. राज्यातील पोलिसांचे मनोबल वाढविण्यासाठी सुमित राठोड यांनी ‘रक्षक’ ही स्फुर्तीदायक कविता रचली. या कवितेला राज्यभरात प्रतिसाद मिळाला. अनेक सामाजीक कामात पुढे असलेले राठोड पक्षी आणि वृक्षीप्रेमी आहेत. आप्तेष्टांच्या समारंभांमध्ये ते आपल्या निसर्गप्रेमाची उधळण करत आलेले आहेत.