
विदर्भ वतन /चंद्रपुर (प्रतिनिधी) : येथील बाबूपेठ परिसरातील हुडको कॉलनीमधील रूग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याने हा परिसर सील करण्यात आला. त्यामुळे नागरिकांची जीवनावश्यक वस्तूसाठी गैरसोय होत होती. हि बाब लक्षात येताच आमदार किशोर जोरगेवार यांनी यंग चांदा ब्रिगेडच्या मदतीने या परिसरात भाजीपाला पाठवून दोन वेळेच्या अन्नपाण्याची होत असलेली गैरसोय टाळली. या कार्यात ब्रिगेडच्या चंदा वैरागडे, स्नेहल अंबागडे, मीना उमाटे, सुशीला पोटे, अर्चना राजूरकर, अपर्णा धकाते, रेखा वैरागडे, राणी बेलोरकर, वंदना साठोने, लीला बुटले, अश्विनी बोकडे यांनी पुढाकार घेतला.

