Home Breaking News आशा वर्कर्सना कोरोना काळातील कामाचा मोबदला देण्यात यावा

आशा वर्कर्सना कोरोना काळातील कामाचा मोबदला देण्यात यावा

74 views
0
विदर्भ वतन / नागपूर (प्रतिनिधी) : कोरोना काळात फस्ट वर्करची भूमिका बजावणार्या आशा वर्कर्सना स्थानीय प्रशासनाकडून अद्याम एक दमडीही मोबदला देण्यात आला नसल्याने अत्यंत गरीब घरातुन पोट भरण्यासाठी या श्रेत्रात उतरलेल्या आशा वर्कर्सची हेंडसाळ सुरू आहे. शासनाने या वर्कर्सकडून कामे करून घेतली पण सुरूवातीपासून देय मोबदला दिला नाही. त्यामुळे यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. अनेकदा निवेदन, आंदोलने करून सुध्दा सुज्ञ शासनाला जाग आली नाही. ‘पैसा नाही तर देणार कुठून’ असे बेजबाबदार शब्द प्रयोग करून या वर्कर्सची सातत्याने अवहेलना करण्यात येत आहे.
आशा व गटप्रवर्तक कर्मचारी युनियन व कंत्राटी कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र साठे यांनी मनपाचे स्थायी समिती अध्यक्ष पिंटू झलके यांची भेट घेऊन यासंदर्भातीत व्यथा मांडल्या. त्यांनी लवकरच महापौरांशी चर्चा करणार असल्याचे सांगीतले. आशा वर्कर्स यांना कोरोना सर्व्हेचे २०० रुपये देण्यात यावे, एपीएल/बीपीएल अट रद्द करून सरसकट ३०० रुपये देण्यात यावे. या मागण्यांसाठी १० जुलैपासून आशा वर्कर्सनी कोरोना कामावर बेमुदत बहिष्कार आंदोलन सुरू ठेवले आहे. जोपर्यंत निर्णय लागणार नाही तोपर्यंत बहिष्कार कायम ठेवण्यात येईल, असे युनियनचे अध्यक्ष राजेंद्र साठे यांनी स्पष्ट केले.