विधान परिषदेसाठी अरूण निटूरे यांची नियुक्ती करा

237

विदर्भ वतन / नागपूर (प्रतिनिधी) : राज्यपालांकडून नियुक्त करण्यात येत असलेल्या विधान परिषदेतील सदस्यत्वसाठी राष्ट्रीय किसान बहुजन पार्टीचे अरूण निटूरे यांची नियुक्त करण्यात यावी असे निवेदन जिल्हाधिकार्यांमार्फत राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना पाठविण्यात आले. राज्यपालांकडून नियुक्त करण्यात येत असलेल्या सदस्यांमध्ये एखादा सदस्य असाही असावा की ज्याला शेतकर्याविषयी इत्यंभूत माहिती असले. यावेळी पार्टीचे राष्ट्रीय उपाध्यक्ष अनिल मेश्राम, सुभाषचंद्र
झा, आतिश राठोड, चंद्रशेखर, अ‍ॅड. रमेश बारई, शामराव भगत, यामिनी देवकर, अनिता थुल, अमित इंगळे, शेषराव मेश्राम, मंदाकिनी गायकवाड, शालिग्राम बनसोडे, कैलास सरकटे, केशव मेश्राम, संजय जाधव आदींची उपस्थिती होती.