
विदर्भ वतन / नागपूर : रत्नभूषण अण्णाभाऊ साठे यांच्या ५१ व्या स्मृति दिनानिमित्त अणाभाऊ साठे स्मारक ट्रस्टच्या वतीने त्यांच्या स्मृतीस अभिवादन करण्यात आले. कोरोनाच्या पार्श्वभूमिवर अधिक समाज बांधवांची जमवाजमव न करता ट्रस्टचे अध्यक्ष लहानुजी इंगळे यांच्या अध्यक्षतेखाली दीक्षाभुमी परिसरातील अणाभाऊ साठे चौक येथील त्यांच्या स्मृतिस पुष्पहार अर्पण करण्यात आला. याप्रसंगी रविन्द्र खडसे, दुर्गेश बावणे, विजय डोंगरे, शरद जाधव, विनायक इंगोले, शिवशंकर ताकतोडे, भरत शिंदे, दद्दु भांजा, सचिन काले, दखनेजी, सागर जाधव, किशोर बिहाडे, शंकरराव वानखेडे, संजय ठोसर, गुरूदास बावने, बोरकरजी, पद्माकर बावणे, भारती कांबले आदींची उपस्थिती होती.

