Home Breaking News २६/११ तील शौर्य चक्र विजेत्याचा वाढदिवस उत्साहात

२६/११ तील शौर्य चक्र विजेत्याचा वाढदिवस उत्साहात

95 views
0

विदर्भ वतन / नागपूर: २६/११ च्या मुंबई हल्ल्याच्या विरोधात जीवाची बाजी लावून लढा देणारे शौर्य चक्र विजेते आणि भारतीय नौदलाचे माजी अधिकारी आणि मॅरेथॉन धावपटू प्रवीणकुमार टियोटिया यांचा सामाजीक कार्यकर्ते सौम्यजित ठाकूर आणि स्वयंसेवी संस्था ‘आबेगेर प्रोयाश’ यांच्या वतीने एका छोट्याखानी कार्यक्रमात वाढदिवस साजरा करण्यात आला. यावेळी प्रवीणकुमार टियोटिया हे एक नम्र अधिकारी असल्याचे ठाकुर म्हणाले. लॉकडाऊन दरम्यान संस्थेने उत्तर बंगाल आणि नागपुरमध्ये गरजुंना अन्न तसेच जीवनावश्यक वस्तुंचे वितरण केले, रक्तदान शिबीरे आयोजित केलीत तसेच रूग्णांना आर्थिक मदत सुध्दा करण्यात आली असे ठाकूर यांनी या कार्यक्रमात सांगीतले.