आचल पाठराबे श्रीमती दादीबाई देशमुख हिंदू मुलींची शाळेतुन प्रथम

184

विदर्भ वतन / नागपूर (प्रतिनिधी) : आचल पाठराबे ही १२ वी तील विद्यार्थीनी महाल येथील श्रीमती दादीबाई देशमुख हिंदू मुलींच्या शाळेतून प्रथम आली आहे. आचलला ९१.२३ टक्के गुण मिळाले. ती जागनाथ बुधवारीतील सावजी गल्लीत राहते. तीचे वडील यशवंत पाठराबे मोलमजुरी करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. संस्थेचे अध्यक्ष रवींद्र फडणवीस, अध्यक्षांच्या प्रतिनिधी सीमा फडणवीस, मुख्याध्यापिका राजश्री किनखेडे तसेच पर्यवेक्षक सुबोध आष्टीकर यांनी तिचे व तीच्या पालकांचे अभिनंदन केले.