कौटुंबिक वादातून वृत्तपत्र विक्रेत्यावर जीवघेणा हल्ला

245
विदर्भ वतन / नागपूर (प्रतिनिधी) : यशोधरा नगर परिसरातील एका वृत्तपत्र विक्रेत्यावर जीवघेणा हल्ला झाल्यामुळे परिसरात खळबळ उडाली. अनिल मेश्राम (रा. शिवशक्तीनगर) असे जखमी वृतपत्र विक्रेत्याचे नाव आहे. अनिल मंगळवारी आपल्या कामावर जात असताना युवराज सुखलाल गजभिये (रा. पांढराबोडी) याने धारदार शस्त्राने अनिलवर हल्ला चढविला यात अनिलच्या चेहरा जखमी झाला. उपचारादरम्यान अनिलला १७ टाके लावण्यात आले. एवढे गंभीर असे या हल्ल्याचे स्वरूप होते.
युवराज हा अनिलचा भासजावई आहे. तो भाचीला देखील त्रास देत राहतो त्यामुळे ती मुलांसह वेगळी राहाते. अनिलने युवराजला समजाविण्याचा प्रयत्न केला याचाच राग मनात धरून त्याने अनिलला लक्ष्य केले असल्याचे समजते. अद्याप पोलिसांनी गुन्ह्याची नोंद केली नाही.  आरोपी युवराज हा अनिलला जीवे मारण्याच्या उद्देशाने टिपु सुल्तान चौकाकडे जाणार्या रिंग रोडवर मंगळवारी सकाळी ९.३० वाजताच्या दरम्यान दबा धरून बसला होता. अनिल दिसताच त्याचेवर धारदार शस्त्राने हल्ला चढविला. खासगी रूग्णालयात अनिलवर उपचार सुरू आहे. रूग्णालयातून अहवाल प्राप्त झाल्यानंतर गुन्ह्याची नोंद केली जाईल असे यशोधरा नगर पोलिसांनी स्पष्ट केले.