Home Breaking News व्यापारचिन्ह मिळाले नसल्याने त्या महिलेचे उपोषण

व्यापारचिन्ह मिळाले नसल्याने त्या महिलेचे उपोषण

164 views
0
विदर्भ वतन /नागपूर : स्वतंत्र व्यवसाय सुरू करण्यासाठी व्यापार चिन्ह मिळण्यास होत असलेल्या दिरंगाई विरोधात एका महिलेने अखेर हताश होऊन हेडगेवार भवनापुढे उपोषणाचा पवित्रा घेतला. दिपमाला नंदन असे या नोकरशाहीने ग्रस्त असलेल्या महिलेचे नाव असून ती मध्यप्रदेश या राज्यातील रहिवाशी आहे. दिनांक ५ आॅक्टोबर २०१६ रोजी बॅटरी निर्मीती या व्यवसायासाठी व्यापार चिन्ह मिळावे म्हणून त्यांनी मुंबई ट्रेडमार्क कार्यालयात निवेदन दिले. परंतू अजुनपर्यंत या कार्यालयाकडून प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे बॅटरीचा कारखाना सुरू करण्याच्या आशेवर या कार्यालयाकडून पाणी फेरले गेले. बालाघाट येथील खासदार बिसेन यांनी याच वर्षी हे प्रकरण संसदेत देखील उचलून धरले तरीसुध्दा गेंड्याची कातडी पांघरलेल्या प्रशासनाला कोणाचाच धाक राहिला नाही. यानंतर पंतप्रधान ते राष्ट्रपतींकडे सुध्दा यासंदर्भात या महिलेने पत्रव्यवहार केला परंतु कुठेच न्याय मिळाला नाही.
कोरोनाचे संकट आणि चीनसोबत बंद करण्यात येत असलेल्या व्यापाराच्या पार्श्वभुमीवर आपल्या देशातील नव्या उद्योजकांना चालना मिळावी यासाठी केंद्रीय पातळीवर कसोसीने प्रयत्न सुरू आहेत. यासाठी उद्योजकांना प्रोत्साहन आणि कर्ज सुध्दा उपलब्ध करून दिल्या जात आहे. विदेशी गुंतवणूकदारांना चोविस तासात परवाने आणि अन्य सुविधा देण्यासाठी तत्पर असलेले शासन मात्र आपल्याच देशातील व्यावसायीकांची अडवणुक करत असल्याचे या प्रकारावरून दिसून येते.
प्रधानमंत्री, राष्ट्रपती आणि संसदेत प्रश्न उचलून सुध्दा न्याय मिळत नसल्याने अखेर सरसंघचालक मोहन भागवत यांच्यापुढे आपल्या व्यथा मांडण्यासाठी त्यांनी हेडगेवार भवनापुढे उपोषणाचा निर्णय घेतला.