
विदर्भ वतन / चंद्रपुर (प्रतिनिधी) : सामाजिक क्षेत्रात सदैव अग्रेसर असणार्या यंग चांदा बिग्रेडची कार्यकारिणी दिनांक १६ जुलै २०२० रोजी घोषित करण्यात आली. या कार्यकारिणीत महिला शहर शाखा करिता भाग्यश्री दिगंबर हांडे यांची निवड़ करण्यात आली. याशिवाय शहर आदिवासी महिला संघटिका म्हणून वैशाली विजय मेश्राम यांची निवड झाली. दलित महिला संघटिका विमल भास्कर काटकर आणि शहर दिव्यांग बांधव संघटिका कल्पना चंद्रशेखर शिंदे यांची निवड करण्यात आली आहे. या कार्यकारिणीतील महिलांची नियुक्ती यंग चांदा बिग्रेडचे सर्वेसर्वा तथा चंद्रपुर विधानसभा क्षेत्राचे आमदार किशोर जोरगेवार व यंग चांदा बिग्रेडचे मुख्य शहर संघटिका वंदना हातगावकर यांनी केली आहे. नियुक्ति झालेल्या आघाडी महिलांचे यंग चांदा बिग्रेडचे सर्व सदस्य आणि इतर मित्र परिवाराने अभिनंदन केले.

