यशवंत स्टेडियम परिसर झाला भिकारीमुक्त

216

आयुक्त मुंढेंचा पुढाकार

विदर्भ वतन / नागपूर : नागपूर महानगरपालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या प्रयत्नाने यशवंत स्टेडीयम परिसर भिकारीमुक्त झाला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून यशवंत स्टेडियम परिसरात भिक्षेकर्यांचे मोठ्या प्रमाणात वास्तव्य होते. दिवसभर शहरातील चौकाचौकात हे भिकारी आढळून येत होते. स्टेडियममधील दुकानदारांनी वारंवार प्रशासनाकडे येथून भिकार्यांचा ठिय्या उचलण्यासंदर्भात निवेदन दिली, त्यांच्यापासुन होत असलेल्या त्रासाच्या तक्रारी सुध्दा केल्या पण प्रशासनाला यश आले नाही. अखेर आयुक्त तुकाराम मुंढे यांनी हा विषय गांभिर्याने घेत उपाययोजना सुरु केली. मनपाची चमु, युवा एनजीओ आणि धंतोली पोलीस यांच्या मदतीने या सर्व भिकारी व भटक्यांचे समुपदेशन करुन त्यांना त्यांच्या मुळ गावाकडे रवाना करण्यात आले. आता हा संपूर्ण परिसर स्वच्छ केला जात आहे.