वाशिममध्ये आणखी १६ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह

183

विदर्भ वतन / वाशिम (प्रतिनिधी): येथे सुध्दा दिवसेंदिवस कोरोना पॉझिटीव्ह रूग्णसंख्येत सातत्याने वाढ होतांना दिसून येत आहे. शहर आणि जिल्ह्याची एकंदरीत स्थीती पाहता नुकत्याच मिळालेल्या अहवालानुसार मंगरूळपीर तालुक्यातील १४ व वाशिम शहरातील दोन व्यक्तींचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याने आरोग्य यंत्रनेवरील चिंता वाढली आहे. मंगरूळपीर शहरातील मंगलधाम परिसरातील ३, संभाजी नगर परिसरातील २, गवळीपुरा परिसरातील २, पंचशील नगर परिसरातील १, चिखली (ता. मंगरूळपीर) येथील ६ व्यक्ती तसेच वाशिम शहरातील गोटे कॉलेज परिसरातील दोन जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यापुर्वी हे सर्वजण कोरोना बाधितांच्या संपर्कात आले असल्याचे समजते. ताज्या आकडेवारीनुसार सध्या शहरात एकूण २७४ इतके रूग्ण कोरोना बाधित आहेत. पैकी (अ‍ॅक्टीव्ह) १५५ जणांवर उपचार सुरू आहे. ११२ रूग्ण उपचारानंतर बरे होऊन घरी परतले तर आतापर्यंत सात जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. पाचव्या लॉकडाऊनमध्ये मोठ्या प्रमाणात शिथीलता देण्यात आली असल्यामुळे प्रत्येक ठिकाणी गर्दी वाढली. कुठेही सोशल डिस्टंसींगचे पालन करताना दिसून आले नाही. शिवाय मास्क देखील योग्य पध्दतीने वापरला जात नसल्याचे एकंदरीत चित्र या नगरीतील आहे. परिणामी संपर्क वाढला आणि कोरोनाची साखळी तोडण्यात अपयश मिळाले त्याचाच परिणाम म्हणून नवनविन कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण सामोर येत आहेत.