सुमित राठोड कोरोणा वीर-प्रेरणादायी पुरस्काराने सन्मानीत

251

विदर्भ वतन /नागपुर : कोरोना काळात आपल्या जीवाची पर्वा न करता कर्तव्य बजावणार्या सुमित राठोड यांना ‘कोरोना वीर-प्रेरणादायी’ पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले. हा पुरस्कार अमरावती येथील अंबाई बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीने देण्यात आला. सुमित राठोड हे नागपूर येथील राज्य राखीव पोलिस दलात पोलिस नायक या पदावर कार्यरत आहेत. लॉकडाऊनची प्रभावीपणे अमलबजावणी करण्यासाठी पोलिसांची भुमिका मोलाची ठरते. त्यामुळे अनेक पोलिसांना स्फुर्ती मिळावी यासाठी त्यांनी कवितेची रचना केली. सुमित राठोड यांनी आपल्या आठ वर्षाच्या नोकरी काळात अनेक सामाजिक उपक्रर स्वत: राबविले आहेत. त्यामुळे त्यांच्या कार्याची दखल घेऊन राज्यभरातील अनेक सामाजिक संघटनांनी त्यांना पुरस्कृत केले आहे. ते तरूणाईसाठी आदर्श ठरत आहेत.