Home Breaking News वृक्षप्रेमी निखिलच्या उपक्रमाने निसर्ग बहरणार

वृक्षप्रेमी निखिलच्या उपक्रमाने निसर्ग बहरणार

112 views
0
प्रतिनिधी
विदर्भ वतन /वाशिम-मानोरा : मित्र, नातेवाईक आणि आप्तेष्टांचे वाढदिवस, लग्न  प्रसंगी, पदोन्नती अशा अनेक कार्यक्रमांना हजेरी लावून शुभेच्छा भेटच्या रूपात पक्षांसाठी पाणपोई तसेच अन्नाची व्यवस्था करून तसेच वृक्षारोपण करून निसर्ग विस्ताराचा संदेश देणारा निखील चव्हाण या युवकाने निसर्ग विस्ताराचा अनोखा उपक्रम राबवून समाजात आपला वेगळाच ठसा उमटविला आहे. अशा आगळ्यावेगळ्या उपक्रमांमुळे तो युवकांसाठी आदर्श ठरतो आहे.
उन्हाळ्यात पक्षांसाठी पाणी, चारा आणि पावसाळ्यात वृक्षारोपणाचा उपक्रम तो मागील तीन वर्षापासुन राबवित आलेला आहे. त्याने परिसरातील गावांमध्ये जावून वेगवेगळ्या झाडांची बीज गोळा केली. यातुन त्याने जवळपास एक हजार आठशे ‘सिडबॉल’ तयार केले. गावातील वृक्ष मित्रांना त्यांनी यातील काही सिडबॉल भेटस्वरूपात दिले तर पाचशे सिडबॉलची लागवड गावपरिसरात आणि भुलीच्या डोंगराळ भागात स्वत: लागवड केली. या उपक्रमाने तो युवकांसाठी आदर्श ठरला आहे. सध्या तो करत असलेल्या स्पर्धा परिक्षेच्या तयारीतुन सवड काढून आपला छंद जोपासत आहे. गावातील तरूणांना सिडबॉल बनविता यावे यासाठी त्याने कार्यशाळा देखील आयोजीत केली. वृक्षांची लागवड ही काळाची गरज आहे आणि हे सर्वांनी केलच पाहिजे असे त्यांनी युवावर्गाला उद्देशून सांगीतले.