Home Breaking News टॉवर लावण्यास नागरिकांचा विरोध

टॉवर लावण्यास नागरिकांचा विरोध

0
टॉवर लावण्यास नागरिकांचा विरोध

विदर्भ वतन /नागपूर : जवळच असलेली शाळा आणि नागरिकांना होणारा संभाव्य त्राट टाळण्यासाठी खाली जागेरवर लावण्यात येत असलेल्या टावरला परिसरातील नागरिकांनी विरोध दर्शविला. प्रभाग क्र. २९ मधील हुडकेश्वर रोड, श्याम नगर येथे विद्युत टावर लावण्याची महावितरणाची योजना आहे. ही बाब कळताच येथील नागरिकांनी आपली असहमती दर्शवित शिवसेनेच दक्षिण नागपूर येथील उपशहर प्रमुख दिपक पोहनेकर यांच्या मार्गदर्शनाखाली विनोद शाहु यांनी झोन क्र. ३ चे उपअभियंता प्रकाश धावडे यांना निवेदन दिले. ज्या खाली जागेवर टावर लावण्यात येणार आहे त्या जागेपासून फक्त ५०० मिटर अंतरावर शाळा असून लोकांची वर्दळ आणि मोठ्या प्रमाणात वास्तव्य आहे त्यामुळे सहजिकच याचा त्रास होईल. हा त्रास टाळण्यासाठी अन्यत्र टावर हलविण्यात यावा अशी मागणी निवेदनातुन करण्यात आली. कार्तिक नारनवरे, राजु पाटिल यांची उपस्थिती होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here