Home Breaking News प्रसिध्दी झोतापासून अलिप्त सुशांत देवानंद नक्षिणे 

प्रसिध्दी झोतापासून अलिप्त सुशांत देवानंद नक्षिणे 

0
प्रसिध्दी झोतापासून अलिप्त सुशांत देवानंद नक्षिणे 

लॉकडाऊनमध्ये गोरगरीबांसाठी ठरला देवदूत

कोरोनामुळे लादण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे अनेकांचे रोजगार बुडाले त्यामुळे त्याच्या कुटूंबीयांवर अक्षरश: उपासमारीची वेळ आली. शासनाने आपल्या परिने अन्न धान्य वाटप केले पण सरकारचे हात कमी पडले. सामाजीक संस्थांनी पुढाकार घेऊन वस्त्यांमध्ये जाऊन धान्य तसेच जीवनावश्यक वस्तूचे वितरण केले. अनेकांनी आपआपल्या परीने खारीचा वाटा उचलुन मानवाला जगविण्याची धडपड केली.
असाच गाजावाजा नकरता, कुठलेली बॅनर पोस्टर न लावता चंद्रपुर येथील पँथ्रोटिना हेल्थ केअर प्रा.लि. चे मॅनेजिंग डायरेक्टर सुशांत देवानंद नक्षिणे यांनी आपल्या समाज बांधवांसाठी मदतीचे हात पुढे केला. संचारबंदीच्या काळात त्यांनी चंद्रपुर येथील गरजुंना ५०० च्या वर धान्य किट्स वाटप केल्या. सोबतच त्यांनी भगतसींग वार्डात रोज ७०-८० लोकांसाठी भोजनाची व्यवस्था देखील केली. गरजूंना ओळखून त्याने या काळात सदैव मदतीसाठी तत्पर असण्याची तयारी ठेवली.
लॉकडाऊन शिथील केल्यानंतर नाभिक व्यवसाय सुरू करण्याची परवानगी देण्यात आली नव्हती. त्यामुळे नाभिक व्यावसायीक आणि त्यात काम करणारे कारागिरांची दैनावस्था झाली होती. राज्यात तर काही नाभिक बांधकवांनी आत्महत्येचे देखील सत्र सुरू केले होते. त्यानंतर अनेक अटी लादुन सलुन व्यवसाय उघडण्यास परवानगी देण्यात आली. अशात सलून कारागीर बांधवांसाठी सुशांत नक्षिणे यांनी सुरक्षाकीट्सचे चंद्रपूर जिल्ह्यासह वर्धा आणि यवतमाळ जिल्ह्यातही वितरण त्यांच्या मागणी प्रमाणे केले. अगदी अशाच प्रकारे आशा वर्कर्सना देखील त्यांनी सुरक्षा किट्स पुरविल्या. या कार्यातुन जराशी उसंती मिळताच त्यांनी रक्तदान शिबीर देखील आयोजीत केले. लॉकडाऊनमुळे घरी बसुन कंटाळलेल्या वातावरणात उत्साह निर्माण व्हावा यासाठी त्यांनी ‘महाराष्ट्र उत्कृष्ट नाभिक वक्ता-२०२०’ हि स्पर्धा आयोजीत केली. या आॅनलाईन वक्तृत्व स्पर्धेचा विषय ‘कोरोनाच्या लढाईत माणुसकीची कसोटी ‘ हा होता.
            नेहमीच इतरांचा आदर्श जोपासून स्वत:च्या कार्याला लहान समजणारा सुशांत नेहमीच प्रसिद्धीपासून अलिप्त राहण्याचा प्रयत्न करताना आढळला, परंतु  आई वडील आणि मित्र परिवार तसेच इतर सहकारी या सर्वांची प्रशंसा नेहमीच त्याचेकडुन ऐकायला मिळते. त्याच्या या प्रेमळ, सुस्वभावी गुणांबरोबरच सेवेच्या या महान कार्याला माझा मानाचा मुजरा.
सौ. सरोज प्रकाश चांदेकर 
संस्थापक अध्यक्षा
प्रेमज्योती बहुउद्देशीय नाभिक महिला मंडळ, चंद्रपूर.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here