कर्मचारी कामावर रूजू होण्यापुर्वी क्वारंटाईन

250

विदर्भ वतन / वर्धा : येथील एसटी महामंडळातील दोन कर्मचारी अन्य जिल्ह्यात रजेवर आपल्या गावी गेले होते. आठ दिवसानंतर परतल्यावर त्यांना वरिष्ठांच्या आदेशानुसार क्वारंटाईन करण्यात आले. कोरोनाचा फैलाव होऊ नये यासाठी जिल्हाबंदी देखील करण्यात आली आहे. जिल्ह्याबाहेर जाणे झालेच तर त्यासाठी रितसर परवानगी घ्यावी लागते. वर्धा येथील एस.टी. महामंडळातील विभागीय कार्यशाळेतील प्रमुख कारागीर प्रमोद तिडके हे ३० जून रोजी ई-पास घेऊन नागपूरला गेले होते, तर सहायक कारागीर प्रिया झाडे या अंजनगाव सुर्जी, जि. अमरावती येथे आपल्या माहेरी गेल्या होत्या. हे दोन्ही कर्मचारी दिनांक ९ रोजी कार्यालयात हजर झाले. मात्र, त्यांना वरिष्ठ अधिकार्यांकडून देण्यात आलेल्या सूचनेनुसार क्वारंटाईन करण्यात आले.