राजगृहातील तोडफोडीचा निषेध, आरोपींना अटक करा

192

राष्ट्रीय जनसुराज्य पक्षाची मागणी, दिले निवेदन

विदर्भ वतन / नागपूर : संविधान निर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मुंबईतील हॅरिटेज बंगल्याच्या तोडफोडीचा निषेध करून आरोपींना तत्काळ अटक करण्यात यावी अशी मागणी राष्ट्रीय जनसुराज्य पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष राजेश काकडे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली.
मुंबईतील दादर परिसरातील याच ठिकाणी बाबासाहेबांचे वास्तव्य होते. मुंबईला जाणारे प्रत्येक बौध्द अनुयायी येथे भेट देतात. येथे आता संग्रहालय आहे ज्यात बाबासाहेबांची पुस्तके, चित्र, राख आणि त्यांनी वापरलेले भांडे यांची उत्कृष्ट प्रकारे जपूण ठेवलेली आहेत. येथे भेट देणारा अनुयायी प्रेरणा घेऊन बाहेर पडतो. शिवाय अनेकांच्या भावना या जागेशी जुळलेल्या आहेत. अशा पवित्र जागेची
दिनांक ७ जुलै रोजी काही माथेफिरूंनी तोडफोड केली. या घटनेमुळे आंबेडकरी समाजात संतापाची लाट पसरली असून या घटनेचा राष्ट्रीय जनसुराज्य पार्टीतर्फे निषेध नोंदविला. तसेच २४ तासात आरोपींना अटक करून शिक्षा करण्यात यावी अशी मागणी नागपूरचे जिल्हाधिकारी तसेच पोलिस आयुक्त यांचे मार्फत राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांना निवेदनाव्दारे केली. अन्यथा संविधान चौकात पार्टीतर्फे धरणे आंदोलन करण्यात येईल असा इशारा देखील देण्यात आला.
निवेदन देतेवेळी पार्टीचे राष्ट्रीय महासचिव चंद्रभान रामटेके, राष्ट्रीय सदस्य शंकर बर्मन, अजय शर्मा, जनाब जैनउल्हा शहा, प्रिती डंभारे, विदर्भ प्रदेश अध्यक्ष तारेश दुरूगकर, विदर्भ प्रदेश महिला अध्यक्ष अमिता भिवगडे, शिव राऊत, रोशन शाहु, संजय अंबाडकर, बनफुल गजघाटे, रितेश उईके, अक्षय उईके, शेख प्यारू शेख मुन्ना, गजानन फटींग आणि शैलेश उईके यांची उपस्थिती होती.