बोगस बियाने प्रकरणी तत्काळ गुन्हे नोंदवा, अन्यथा आंदोलन

188

शिवसेनेचे तुषार देवढे यांचा इशारा

विदर्भ वतन / वर्धा : जिल्ह्यातील गोविंदपूर येथील शेतकर्याने आपल्या शेतात पेरलेले ६५ बॅग सोयाबीन उगवलेच नसल्यानी तक्रार दिल्यानंतर जिल्हा कृषी अधिकार्यांनी पंचनाम्याने आदेश दिले. या पंचनाम्यात आढलेल्या तत्थ्याच्या आधारावर जिल्ह्याच्या दौर्यावर असलेले कृषि मंत्री दादाजी भुसे यांचेपुढे कैफियत मांडण्यात आली. त्या आधारावर बोगस सोयाबीन निर्मिती करणार्या कंपनीवर गुन्हे दाखल करण्यात यावे, असे आदेश कृषी मंत्र्यांनी दिले. मात्र अद्याप कृषी मंत्र्यांच्या आदेशाची दखल घेण्यात आली नसल्यामुळे शिवसेना उपजिल्हा प्रमुख तुषार देवढे यांनी जिल्हा कृषी अधिकार्यांना आंदोलनाचा इशारा दिला आहे.
गोविंदपूर येथील शितल चौधरी या शेतकर्याने इगल एक्सलंट कंपनी निर्मित ६५ बँग सोयाबीन विक्रेता अरूण सिड्स अ‍ॅण्ड पेस्टीसाईड्स यांचेकडून नगदी व्यवहाराने खरेदी केले. मात्र पेरणी केल्यानंतर हे महागडे सोयाबीन उगवलेच नाही. त्यामुळे शेतकर्याने नुकसान भरपाईची मागणी केली होती. यावर कोणीच गांभीर्याने लक्ष दिले नाही. या अन्यायाविरोधात शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख तुषार देवढे यांनी जिल्हाधिकारी तसेच वरिष्ठ दर्जाचे कृषी अधिकार्यांकडे तक्रारी दिल्या होत्या. या तक्रारीच्या आधारे वरिष्ठांनी चौकशीचे आदेश दिले. चौकशीत सोयाबीन बोगस असल्याचे आढले. तरी सुध्दा कंपनीवर शासकीय पातळीवर कारवाई करण्यात आली नव्हती. दरम्यान राज्याचे कृषी मंत्री दादाजी भुसे वर्धा जिल्ह्याच्या दौर्यावर असताना तुषार देवढे यांनी त्यांची भेट घेवून अन्यायग्रस्त शेतकर्याची कैफियत आणि अधिकार्यांची संशयास्पद भूमिका मांडली. दोषींवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश मंत्र्यांनी दिले. मात्र, अद्याप गुन्हे दाखल करण्यात आले नसल्याने शिवसेना उपजिल्हा प्रमुख तुषार देवढे यांनी आता जिल्हा कृषी अधिकार्यांना आंदोलनाचा इशारा दिला आहे.