
विदर्भ वतन न्युज पोर्टल – देशात कोरोना संक्रमितांची संख्या 7 लाख 69 हजार 52 झाली आहे. बुधवारी विक्रमी 25 हजार 559 समोर आले आहेत. तर दिल्लीमध्ये रिकव्हरी रेट 74%57 पेक्षा जास्त झाला आहे. राज्यात 1 लाख 4 हजार 864 रुग्ण आहेत. यामधील 78 हजार 199 रुग्ण हे बरे झाले आहेत.
तर बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी म्हणाल्या की, गुरुवारी संध्याकाळी 5 वाजता राज्याच्या कंटेनमेंट झोनमध्ये लॉकडाऊन लागू करण्यात येईल. सध्या लॉकडाऊन केवळ 7 दिवसांसाठी असेल. गरज वाटल्यास लॉकडाऊन पुन्हा एकदा वाढवण्यात येणार आहे. मध्यप्रदेशात वाढत असलेली कोरोना रुग्णांची संख्या पाहता गृहमंत्री आणि आरोग्य मंत्री निरोत्तम मिश्रा यांनी बुधवारी म्हटले की, आता रविवारी संपूर्ण मध्य प्रदेशात लॉकडाऊन असणार आहे. दूसऱ्या प्रदेशांमधून येणाऱ्या जाणाऱ्या लोकांमुळे प्रदेशची परिस्थिती बदलत आहे. प्रदेशात येणाऱ्या जाणाऱ्या लोकांची बॉर्डरवर तपासणी केली जाणार आहे.

